
मुंबई : परवडणाऱ्या घरांसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या इंडिया लिमिटेडने भांडवली बाजारातून निधी उभारणीचा निर्णय घेतला आहे. प्रारंभिक योजनेतून ११५३. ७२ कोटी उभारणार असून ही योजना गुरुवारी २१ जानेवारी रोजी खुली होणार आहे. या योजनेत प्रती शेअर ५१७ ते ५१८ रुपये असा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. किमान २८ शेअर्ससाठी गुंतवणूकदारांना बोली लावता येईल. या योजनेतून एकूण ११५३. ७२ कोटी उभारणार असून त्यात २६५ कोटींच्या ताज्या इश्यूचा समावेश आहे. एक्सिस कॅपिटल लिमिटेड, क्रेडीट स्युस सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड तसेच कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे या प्रस्तावाचे बीआरएलएम आहेत. यात नेट ऑफरच्या ५० टक्क्यांहून अधिक भाग गुणोत्तर आधारे पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या वाटपाकरिता नाही (क्यूबीआय, क्यूबीआय वाटा) त्याशिवाय, सेबी आयसीडीआर नियमनानुसार, विना-संस्थात्मक बोलीकर्ते (नॉन इन्स्टीट्युशनल बीडर्स)’ना १५ टक्क्यांपेक्षा कमी रकमेचे वाटप करता येणार नाही आणि इश्यूच्या ३५ टक्क्यांहून कमीचे वाटप वैयक्तिक रिटेल बोलीकर्ते (रिटेल इंडीविज्युअल बीडर्स)ना करता येणार नाही,असे कंपनीने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी सेबीने होम फर्स्ट फायनान्स कंपनीच्या आयपीओला परवानगी दिली होती. २०१० मध्ये सुरु झालेल्या होम फर्स्ट फायनान्स कंपनीने आतापर्यंत ५० हजारांहून अधिक ग्राहकांना कर्ज दिले आहे. ११ राज्यांमधील ६० जिल्हे आणि एका केंद्र शासित प्रदेशात कंपनीचा व्यवसाय आहे. सप्टेंबर २०२०अखेर कंपनीची मालमत्ता ३७३० कोटी आहे. ज्यात ९८८ कोटींची नेटवर्थ असून अनुत्पादित मालमत्ता ०.७४ टक्के इतकी आहे. सप्टेंबर २०२० च्या सहामाहीत कंपनीच्या नफ्यात ४४.१ टक्के वाढ झाली. कंपनीला ५२.९५ कोटींचा नफा झाला. या महिन्याचं सुरवातीला वारबर्ग पिनकस या कंपनीने होम फर्स्ट फायनान्स कंपनीमधील हिस्सा ५.०३ टक्क्यांवरून ३०.६२ टक्के इतका वाढवला होता. होम फर्स्ट फायनान्स कंपनीची समभाग विक्री - रुपये २ प्रती दर्शनी मूल्याचा इक्विटी शेअरचा किंमत पट्टा प्रती ५१७-५१८ रुपये (इक्विटी शेअर) - प्रस्ताव खुला २१ जानेवारी २०२१ आणि प्रस्ताव बंद होण्याची तारीख सोमवार २५ जानेवारी २०२१ - किमान २८ इक्विटी शेअर्सचा तसेच त्यानंतर इक्विटी शेअरच्या २८ पटीत. - फ्लोअर प्राईज ही इक्विटी शेअर दर्शनी मूल्याच्या २५८.५० पटीत तसेच कॅप प्राईज, इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या २५९ पटीत