पुणेः प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक यांच्या कार्यालयावर ईडीने छापे टाकल्यानंतर आता भोसले यांचा मुलगा यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. अमित भोसले यांना मध्यरात्री पुण्याहून मुंबईला आणण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. बुधवारी ईडीने अविनाश भोसले यांच्या 'अबिल हाउस' या कार्यालयावर छापे टाकले. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली होती. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची 'ईडी'ने चौकशी सुरू केली आहे. बुधवारी दिवसभर 'ईडी'चे अधिकारी कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करीत होते. परदेशातील खात्यामध्ये पैसे जमा केल्याच्या संशयावरून 'ईडी'कडून तपास सुरू असल्याचे बोलले जात आहे. मध्यरात्री तपासणी पूर्ण झाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तसंच, कार्यालयात सापडलेली कागदपत्रेही मुंबईला नेण्यात आली आहेत. वाचाः अविनाश भोसले यांची दहा तास चौकशी नोव्हेंबरमध्ये अविनाश भोसले यांची ईडीने चौकशी केली होती. नोव्हेंबरमध्ये ईडीने भोसले यांना मुंबईत चौकशीसाठी बोलवून घेतलं होतं. तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यानं त्यांची तब्बल दहा तास चौकशी केली होती. वाचाः कोण आहेत अविनाश भोसले? अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वाचाः नेमकी कोणत्या प्रकरणात भोसले यांची चौकशी? अविनाश भोसले यांनी २००७ मध्ये परदेशातून महागड्या वस्तू आणल्याने तसेच परदेशी चलन बाळगल्याने ईडीने फेमा अंतर्गत तेव्हा तपास केला होता. मात्र, आता नेमकी कोणत्या प्रकरणात भोसले यांची चौकशी करण्यात येत आहे, हे मात्र ईडीकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.