IND vs ENG : भारतीय संघाला मोठा धक्का, पाच खेळाडू अनफिट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, February 11, 2021

IND vs ENG : भारतीय संघाला मोठा धक्का, पाच खेळाडू अनफिट

https://ift.tt/2NbNgsq
चेन्नई, : भारतीय संघ अजूनही दुखापतींच्या फेऱ्यांमध्ये अजूनही अडकलेला पाहायला मिळत आहे. कारण भारताचे पाच खेळाडू अजूनही अनफिट ठरले आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी हा एक मोठा धक्का असेल. भारताला इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमवावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी संघ निवड ही भारतीय संघासाठी महत्वाची आहे. पण भारतीय संघासमोर आता पर्याय जास्त नसल्याचेच पाहायला मिळत आहे. कारण भारताचे पाच खेळाडू अजूनही अनफिट ठरले आहेत. त्यामुळे भारतीय संघापुढे संघ निवडीसाठी फारच कमी पर्याय असल्याचे म्हटले जात आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी लोकेश राहुलची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. पण अजूनही राहुल पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातही तो खेळू शकणार नाही, कारण दुखापतीमधून राहुल अजूनही सावरलेला नाही. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यातही खेळू शकणार नाही. त्याचबरोबर राहुलसह अजून चार खेळाडूही पूर्णपणे फिट ठरलेले नाहीत. त्यामुळे भारतीय संघाची चिंता अजून वाढलेली आहे. एका अहवालात एक गोष्ट समोर आली असून भारताचे रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, उमेश यादव आणि मोहम्मद शमी हे खेळाडू दुखापतीमधून पूर्णपणे सावरलेले नाहीत. हे सर्व खेळाडू शंभर टक्के फिट नाहीत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्यांचा विचार करण्यात येणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात या सर्व खेळाडूंना दुखापत झाली होती. पण या दुखापतीमधून ते पूर्णपणे सावरलेले सध्याच्या घडीला तरी दिसत नाहीत. भारतीय संघाला हा एक मोठा धक्का असेल. कारण या खेळाडूंकडे चांगला अनुभव आहे, पण ते खेळू शकत नाहीत. त्याचबरोबर भारतीय संघाने पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे आता विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत जर त्यांना पोहोचायचे असेल तर त्यांना एकही सामना गमावून चालणार नाही. त्यामुळे अशा निर्णायक वेळेला भारताचे हे अनुभवी खेळाडू संघात नसणे, हे नक्कीच संघासाठी चांगले चिन्ह नाही. पण सध्याच्या घडीला तरी या खेळाडूंशिवायच भारतीय संघाला खेळावे लागेल, असेच दिसत आहे.