शेतकरी आंदोलन : सचिन - कोहलीला काँग्रेसचा टोला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, February 4, 2021

शेतकरी आंदोलन : सचिन - कोहलीला काँग्रेसचा टोला

https://ift.tt/3oMovjE
नवी दिल्ली : भारताच्या राजधानीच्या सीमेवर गेल्या ७० हून अधिक दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सोशल मीडियातून आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. त्यानंतर भारतातील काही क्रिकेटर्स आणि बॉलिवूडच्या मंडळींकडून 'ही भारताची ' असल्याचं सांगत केंद्रातील सरकारकडून तयार करण्यात आलेल्या #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या दोन हॅशटॅगचाही वापर करण्यात आला. यावरून काँग्रेस नेते यांनी सत्ताधाऱ्यांची 'री' ओढणाऱ्या सेलिब्रिटींना खडे बोल सुनावले आहेत. 'भारत सरकारसाठी प्रसिद्ध भारतीय मंडळींनी पाश्चिमात्यांवर पलटवार करणं लाजिरवाणं आहे. भारत सरकारची अडीग वृत्ती आणि लोकशाहीविरोधी वर्तनामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला जे नुकसान झालंय त्याची भरपाई क्रिकेटर्सच्या ट्विटमुळे होऊ शकत नाही' असं शशी थरूर यांनी म्हटलंय. भारताची तीव्र प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाबाबत घेतलेल्या भूमिकेवरून भारत सरकारकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. यामागे काही हितसंबंधीय गट असून देशाच्या काही भागातील अवघ्या काही शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील सुधारणांबाबत शंका आहेत. या आंदोलनाबद्दल घाईघाईत प्रतिक्रिया देण्याआधी हा विषय समजून घेणं आवश्यक आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे म्हटलं होतं. तसंच यासोबत #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही वापरण्यात आले होते. क्रिकेटर्सचा पाठिंबा यानंतर माजी क्रिकेटर्स , अनिल कुंबळे, , रवी शास्त्री यांनीदेखील हे हॅशटॅग वापरून ट्विट करत सरकारला पाठिंबा दिला होता. 'भारत काय आहे ते भारतीयच जाणतात आणि भारताचं काय करायचं ते भारतीयच ठरवतील. यात बाहेरच्यांनी पडू नये. भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होऊच शकत नाही' असं सचिननं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. 'या मुद्यांना राष्ट्रीय सीमा नाहीत...' काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृह-अर्थ मंत्री यांनीही या विषयावर भाष्य केलंय. ही भारताची अंतर्गत बाब आहे, असं म्हणणाऱ्यांना त्यांनी टोला लगावलाय. 'मानवाधिकार आणि सामान्यांच्या उदरनिर्वाहाच्या मुद्द्यांशी संबंधित व्यक्ती राष्ट्रीय सीमांना मान्यता देत नाहीत हे परराष्ट्र मंत्रालयाला कधी समजणार? परराष्ट्र मंत्रालयाकडून म्यानमारमधील सत्तापालटावर भाष्य का करण्यात आलं होतं? परराष्ट्र मंत्रालयाला याची चिंता का वाटली? श्रीलंका आणि नेपाळच्या 'अंतर्गत' बाबींवर वेळोवेळी प्रतिक्रिया का व्यक्त केली जाते? अमेरिकेतील संसद भवनावर झालेल्या हल्ल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रतिक्रिया का व्यक्त केली?' असे प्रश्न केंद्राला विचारत 'एस जयशंकर यांच्यासारख्या विद्वान व्यक्तीनं परराष्ट्र मंत्रालयाला अशा बालिश प्रतिक्रिया देण्यापासून परावृत्त करायला हवं' असा सल्लाही पी चिदंबरम यांनी दिलाय. शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा ख्यातनाम पॉप गायिका रिहाना, स्वीडनमधील किशोरवयीन पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची आणि प्रथितयश वकील मीना हॅरिस यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सोशल मीडियावरून पाठिंबा जाहीर केला आहे. पॉप गायिका रिहाना हिने अनेक भागात इंटरनेट बंद करून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईसंदर्भातील एक लेख मंगळवारी सोशल मीडियावर शेअर केला होता. 'आपण याबद्दल का बोलत नाही' असा प्रश्न तिनं 'फार्मर्स प्रोटेस्ट' () असा हॅशटॅग वापरून विचारला होता. त्यानंतर ग्रेटा थनबर्ग हिनेही या संदर्भातील 'सीएनएन'च्या बातमीला टॅग करून सोशल मीडियावर आपलं मत मांडलं. 'भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही समर्थन देत आहोत' असं ग्रेटानं म्हटलं. भारताची ग्रेटा म्हणून ओळखली जाणारी नऊ वर्षांची पर्यावरणवादी कार्यकर्ती लिसीप्रिया कांगुजम हिनं ग्रेटाला ट्विटरवर टॅग करून आधीच हवामान बदलाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. अमेरिकेत वकील असलेल्या मीना हॅरिस यांनी शेतकरी आंदोलनाबाबत आपलं मत ट्विटरवर व्यक्त करताना म्हटलं 'जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर एका महिन्यापूर्वीच हल्ला झाला होता आणि याबाबत चर्चा होत असतानाच जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या लोकशाहीवर हल्ला होत आहे, हा योगायोग नाही. याचा एकमेकांशी संबंध आहे'.