करोना विषाणू धोकादायक होतोय? आणखी एक नवा स्ट्रेन आढळला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, February 9, 2021

करोना विषाणू धोकादायक होतोय? आणखी एक नवा स्ट्रेन आढळला

https://ift.tt/2MF1K4l
ब्यूनस आयर्स: जवळपास एक वर्षापासून जगभरात संसर्गाने थैमान घातले आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी शास्त्रज्ञांकडून प्रयत्न सुरू आहेत. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्ये आढळल्यानंतर चिंता वाढली असताना दुसरीकडे आता अर्जेंटिनामध्ये आणखी एक स्ट्रेन आढळला आहे. रशियन वृत्तसंस्था स्पुटनिकने अर्जेंटिनामध्ये करोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याचे वृत्त दिले आहे. अर्जेंटिनाचे आरोग्य मंत्री जिनीज गार्सिया यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले. या नव्या स्ट्रेनबाबत फारशी माहिती समोर आली नाही. गार्सिया यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्याशिवाय, अॅमेझॉनमध्ये आढळलेला पी१ आणि रिओ दी जनेरोमध्ये आढळलेला पी२ स्ट्रेनदेखील अर्जेंटिनामध्ये आढळले आहेत. वाचा: करोना महासाथीच्या काळात करोना विषाणू शेकडो वेळेस म्यूटेट झाला असल्याचे समोर आले आहे. मात्र, करोनाच्या तीन वेरिएंटबाबत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. हे तीन वेरिएंट वेगाने संसर्ग फैलावतात. यामध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये आढळलेल्या स्ट्रेनचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या करोनाच्या संसर्गावर लशीचाही परिणाम होत नसल्याचे समोर आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. वाचा: दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने ऑक्सफर्ड लशीचा वापर थांबवला आहे. करोनाच्या नव्या स्ट्रेनवर ही लस फारशी प्रभावी ठरत नसल्याचे समोर आल्यानंतर लशीचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी म्हटले. दक्षिण आफ्रिकेतील दोन विषाणू तज्ज्ञांनी या लशीचा वापर थांबवणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. लस संशोधनासाठी नव्या पद्धतीचे पालन करणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. कोलंबिया विद्यापीठातील तज्ज्ञ सालिम अब्दुल करीम यांनी सांगितले की, ऑक्सफर्डच्या करोना लशीचा वापर काही वेळेसाठी थांबवणे आवश्यक आहे. लशीचा वापर पुन्हा सुरू करण्यासाठी नव्या पद्धतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले लशीचा काय परिणाम? करोनाच्या नव्या स्ट्रेनचा वाढता धोका लक्षात घेऊन इतर लस कंपन्यांही सावध झाल्या आहेत. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आणि नोवावॅक्सने आपली लस करोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर, मॉडर्ना नव्या स्ट्रेनसाठी बुस्टर शॉट विकसित करत आहे. तर, फायजर-बायोएनटेकची लसही कमी प्रभावी असल्याचे दिसून आले.