
मुंबई: '' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे; कारण आणि हे कलाकार या सिनेमात एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ असेल. विशेष म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. चित्रपटाच्या सेटमधील आयुष शर्माने स्वत:चा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आयुष वेगळ्या लूकमध्ये दिसतोय. आयुषने या फोटोच्या माध्यामातून त्याची भूमिका किती दमदार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा फोटो शेअर करत त्यानं कॅप्शनमध्ये 'राहुल्या' असं लिहिलंय. सिनेमात आयुषचं नाव राहुल असेल हे यावरून स्पष्ट होतंय. 'मुळशी पॅटर्न' या मराठी सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. मराठीत नायकाचं असलेलं नाव हिंदीत देखील कायम ठेवण्यात आलं आहे. सलमान खान सिनेमात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे तर आयुष गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.