
मुंबई: मिस युनिव्हर्स इंडिया ते बॉलिवूड पर्यंत अभिनेत्री पूजा हेडगेचा फॅशनसेन्स क्यूट स्माइल आणि टॅलेंट या सर्वच गोष्टींनी अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पूजा हेगडेनं केवळ बॉलिवूडच नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येही आपलं स्थान पक्कं केलं आहे. पूजा नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचे १२ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. याशिवाय तिची अनेक फॅनपेज सुद्धा आहे. पूजानं चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी Post Photo Of या ट्रेंडमध्ये भाग घेतला होता. ज्यात तिच्याकडे एका युझरनं न्यूड फोटोची मागणी केली आणि पूजानंही त्याला जशास तसं उत्तर दिलं. मागच्या काही काळापासून इन्स्टाग्रामवर Post Photo Of हा ट्रेंड खूपच लोकप्रिय झाला आहे. एवढंच नाही तर बॉलिवूडच्या दीपिका पदुकोण पासून ते अगदी मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रिया बापट यांनाही या ट्रेंडनं भूरळ घातली होती. त्यानंतर आता पूजा हेगडेनं देखील या ट्रेंडच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. ज्यात तिनं तिच्या फोन गॅलरीमधील अनेक फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केले. पण याच सेशनमध्ये एका युझरनं पूजाकडे न्यूड फोटोची मागणी केली. ज्यावर पूजानं देखील अगदी मजेशीर अंदाजात एक फोटो शेअर करत त्या युझरला सडेतोड उत्तर दिलं. युझरनं अशाप्रकारे न्यूड फोटोची मागणी करताच त्याला धडा शिवकण्यासाठी पूजा हेगडेनं आपल्या उघड्या पायांचा फोटो इस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत त्याला ‘नंगे पाँव’ असं कॅप्शन दिलं. पूजाच्या या उत्तरावर सर्वांनीच तिचं कौतुक केलं आहे. तिनं अगदी गंमतीदार अंदाजात ही परिस्थिती हाताळल्यानं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. पूजा हेगडेनं २०१२ मध्ये साऊथ चित्रपट 'Mugamoodi' मधून डेब्यू केला होता. त्यानंतर तिनं हृतिक रोशनसोबत ‘मोहेंजोदारो’ चित्रपटात काम केलं होतं. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला तरीही तिच्या अभिनयाचं मात्र कौतुक झालं. त्यानंतर तिनं 'Saakshyam' आणि 'हाउसफुल 4' या चित्रपटांमधून आपलं अभिनय कौशल्य दाखवून दिलं. लवकरच ती दिग्दर्शक भास्कर यांच्या ‘मोस्ट एलिजबल बॅचलर’ या चित्रपटात दिसणार आहे. ज्यात तिच्यासोबत अखिल अक्कीनेनी प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय ‘सर्कस’, ‘आचार्य’ आणि प्रभासचा ‘राधेश्याम’ हे चित्रपट तिच्याकडे आहेत.