शाळेचे अजब नियम; केस काळे नाहीत, मग खरे केस असल्याचे प्रमाणपत्र द्या! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 26, 2021

शाळेचे अजब नियम; केस काळे नाहीत, मग खरे केस असल्याचे प्रमाणपत्र द्या!

https://ift.tt/2ZVpKTq
टोकियो: शाळेतील नियमांमुळे अनेकदा पालक हैराण होतात. शाळांप्रमाणे नियम बदलत असतात. शालेय विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी असलेल्या नियमांमुळे भारतातील पालक हैराण होतात. हीच वेळ जपानमधील पालकांवर आली आहे. विद्यार्थ्यांची केस काळी नसल्यास त्यांनी ही केस खरी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. टोकियोतील काही शाळांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. मुलांकडून हेअर स्टायलिंगचे प्रमाण वाढले आहे. केसांना रंगही लावला जात आहे. मुलांमध्ये शिस्तीचे धडे देण्यासाठी शाळांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या केसांना रंग काळा नाही, अशा विद्यार्थ्यांना आपल्या केसांना कृत्रिम रंग लावला नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. वाचा: शहरातील १७७ पैकी ७९ शाळांनी हा आदेश काढला आहे. जपानच्या अनेक शाळांमध्ये केसांचे रंग, मेकअप, गणवेश आणि विद्यार्थीनींच्या स्कर्टच्या लांबीबाबतही कठोर नियम आहेत. टोकियोतील शिक्षण बोर्डाने जपानी माध्यमांना सांगितले की, केसांसाठीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता सर्वच ठिकाणी नाही. मात्र, ७९ शाळांपैकी फक्त पाचच शाळांनी या प्रमाणपत्रांची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. वाचा: दरम्यान, करोना महासाथीच्या कालावधीत जपानमध्ये आत्महत्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आत्महत्येच्या वाढत्या घटना लक्षात घेता जपान सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एकाकीपणावर मात करण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र मंत्रालय तयार केले आहे. वाचा: जपान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, करोना महासाथीच्या काळात, वर्ष २०२०मध्ये जपानमध्ये एकाकीपणामुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्याची नोंद करण्यात आली. जवळपास ११ वर्षानंतर आत्महत्येच्या प्रकरणांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोंद करण्यात आली. त्यानंतर आता जपान सरकारने एक वेगळे मंत्रालय बनविण्याचा निर्णय घेतला आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून लोकांच्या एकाकीपणावर मात करण्याचा प्रयत्न होणार आहे.