'सतत हॉर्न वाजवल्यास 'ऑटोमेटिक' दंड व्हायला हवा' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 10, 2021

'सतत हॉर्न वाजवल्यास 'ऑटोमेटिक' दंड व्हायला हवा'

https://ift.tt/3jyaxkt
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई वाहतूककोंडीमध्ये अडकल्यावर किंवा इतर वेळीही सतत वाजवणाऱ्यांना स्वयंचलित पद्धतीने दंड ठोठावला जावा. लंडन पोलिसांची पद्धत यासाठी अंमलात आणली जावी आणि हे प्राधान्यक्रमाने व्हावे, अशी अपेक्षा यांनी व्यक्त केली. रस्ते सुरक्षा महिन्याच्या पार्श्वभूमीवर हॉर्न जितके कमी वाजतील तितका आरोग्यावर परिणाम कमी होईल, संताप, चिडचिड कमी होईल आणि वाहतूकही अधिक सुकर होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आवाज फाऊंडेशन आयोजित हॉर्न आणि सुरक्षा या विषयासंबंधित चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. ओक यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी ध्वनी प्रदूषणासंदर्भात बोलायला सुरुवात केली. हा विषय आजही तितकाच तीव्र आहे हे या निमित्ताने समोर आले. या चर्चासत्रामध्ये वाहतूक विभागाचे पूर्व उपायुक्त हरीश बैजल सहभागी झाले होते. बैजल यांनीही यावेळी सातत्याने वाजणाऱ्या हॉर्नविरोधात लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत मांडले. वाचा: रस्त्यावरील वाढणाऱ्या गाड्यांमुळे मुंबई वाहतूक पोलिस सर्व संख्येने जरी रस्त्यावर आले तरी सगळ्या दोषींवर कारवाई होणार नाही, असे सांगत यासाठी जनजागृतीही गरजेची असल्याचे ते म्हणाले. आपण ब्रेकचा वापर विसरलो आहोत. तसेच ओव्हरटेक करताना दिव्यांचा वापर करता येतो याचाही विसर पडल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. बैजल यांच्या काळामध्ये हॉर्नविरोधी मोहिमेला सुरूवात झाली होती. त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी आपले मत नोंदवले. आयोजिक सुमैरा अब्दुलली यांनी हॉर्नमुळे आपल्याला आपण सुरक्षित आहोत असे वाटते, मात्र ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. याची मात्र आपल्याला जाणीव नाही, त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत मांडले. वाचा: जसलोक रुग्णालयाच्या औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अल्ताफ पटेल यांनी शरीरावर तसेच मानसिक आरोग्यावर ध्वनीप्रदूषण, सतत वाजणारे हॉर्न यामुळे होणाऱ्या परिणामांबद्दल सांगितले. कमला रहेजा इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरचे प्रा. हुसैन इंदोरवाला यांनी मुंबईमध्ये सातत्याने अधिकाधिक वाहने रस्त्यावर येण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर कसा कमी झाला आहे हेही आकडेवारीतून दाखवले. अधिक खासगी गाड्यांमधून कमी माणसांची वाहतूक होते, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा आणि त्यातही आर्थिक घटकांचा आणि सोयीचा विचार करता बस, लोकल याच्या सुधारणेकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली. वागणुकीत बदलाची अपेक्षा या चर्चासत्रामध्ये सिग्नल यंत्रणेजवळ डेसीबल मीटर बसवावा अशी सूचना करण्यात आली. या सूचनेचे स्वागत करत यामुळे लोकांना आपण किती जोरात हॉर्न वाजवतो याची जाणीव होऊन हळुहळू वागणुकीत बदल होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली. आवाज फाऊंडेशनच्या माध्यमातून या मागण्या सरकार दरबारी पोहोचाव्या असेही यावेळी सांगण्यात आले. वाचा: