'खान'वर पडला भारी! अक्षय कुमारवर लागलेत इण्डस्ट्रीचे १५०० कोटी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 6, 2021

demo-image

'खान'वर पडला भारी! अक्षय कुमारवर लागलेत इण्डस्ट्रीचे १५०० कोटी

https://ift.tt/36NfYHb
photo-80719456
मुंबई- पॉप स्टार रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल केलेल्या ट्विटने आंदोलनाबद्दलच्या चर्चांना उधाण आलं. बॉलिवूड कलाकार एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले. काही कलाकारांनी आंदोलनाचे समर्थन केले तर काहींनी त्याला विरोध केला. रिहानाच्या ट्विटचे पडसाद जगभरात उमटले असतानाच याविषयावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि पंजाबी गायक दिलजीत दोसांज यांचे ट्विटरवर शीतयुद्ध सुरु झाले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत त्यांनी आपली बाजू मांडली. यासंपूर्ण प्रकारावर 'बिग बॉस' मधील स्पर्धक व स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान याने कंगना आणि दिलजीत यांकडे एक वेगळीच मागणी केली. कमाल याने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ही मागणी केली. त्याने ट्विट करत कंगना आणि दिलजीतला त्याचा '२ रुपये' वाला डायलॉग न वापरण्याची विनंती केली. त्याने लिहिलं, 'तुम्ही दोघेही म्हणजे कंगना रणौत आणि दिलजीत दोसांज, कृपया माझं '२ रुपयेवाले लोक' हे वाक्य वापरणं बंद करा.' दिलजीतने रिहानावर बनवलेल्या गाण्यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने 'तुम्ही २ रुपयेवाले लोक' हे वाक्य वापरलं होतं. या गाण्यावर आपली प्रतिक्रिया लिहिताना कंगनाने लिहिलं की, 'यालाही त्याचे २ रुपये कमवायचे आहेत. हे सर्व कधीपासून सुरू आहे? एक गाणं तयार करायला निदान एक महिना लागतो आणि यांना वाटतं आम्ही यांच्यावर विश्वास ठेवावा. #Indiatogether #IndiaAgainstpropoganda.' तिला प्रतिउत्तर देताना दिलजीतनेही त्याच वाक्याचा वापर करत लिहिलं की, '२ रुपये? तुझ्या कामाची पद्धत तू मला नको सांगू. गाणं तर मी अर्ध्या तासात बनवू शकतो.' या वाक्याचा प्रथम वापर कमालने 'बिग बॉस' मध्ये केला होता. त्यामुळे त्याने याबाबतीत ट्विट करत ते वाक्य माझं आहे, तुम्ही त्याचा वापर करू नका,असं बजावलं.

Pages