चेन्नई कसोटीत भारतीय गोलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी; १० वर्ष जुना विक्रम मोडला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 7, 2021

चेन्नई कसोटीत भारतीय गोलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी; १० वर्ष जुना विक्रम मोडला

https://ift.tt/3pWJrpD
चेन्नई: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. इंग्लंडने तब्बल १९० षटके फलंदाज केली. पहिल्या डावात इंग्लंडने ५७८ धावा केल्या. भारताकडून आर अश्विन आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी ३ तर इशांत शर्मा आणइ शाहबाज नदीमने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात एक लाजिरवाणी कामगिरी केली. त्यांनी १० वर्षापूर्वीचा एक नकोसा वाटणारा विक्रम मागे टाकला. वाचा- पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी २० टाकले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही संघाकडून एका डावात टाकण्यात आलेले दुसऱ्या क्रमांकाचे नो बॉल ठरले आहेत. भारताने २०१० साली कोलंबो येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत सामन्यात श्रीलंकेविरुद्ध १६ नो बॉल टाकले होते. भारतीय संघाने तो सामना जिंकला होता. वाचा- कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा विक्रम श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या नावावर आहे. त्यांनी २०१४ च्या चटगाव येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक २१ नो बॉल टाकले होते. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी टाकलेल्या २० नो बॉलपैकी सात नो बॉल जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहने टाकले. तर शाहबाज नदीमने ६, इशांत शर्माने ५ आणि आर अश्विनने २ नो बॉल टाकले. भारताने पहिल्या डावात ४५ अतिरिक्त धावा दिल्या. वाचा- भारताने याआधी जेव्हा सर्वाधिक नो बॉल टाकले होते तेव्हा इशांत शर्मा भारतीय संघात होता. तेव्हा दोन्ही डावात मिळून त्याने आठ नो बॉल टाकले होते. इंग्लंडच्या डावात भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी झगडावे लागले. त्याच बरोबर कर्धार विराट कोहलीने घेतलेले डीआरएस रिव्यू देखील अपयशी ठरले.