'एकसंध करा, भिंती उभारू नका', राहुल गांधींचा मोदी सरकारला सल्ला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, February 2, 2021

'एकसंध करा, भिंती उभारू नका', राहुल गांधींचा मोदी सरकारला सल्ला

https://ift.tt/3oFtceX
नवी दिल्ली : केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा आजचा तब्बल ६९ वा दिवस आहे. दोन महिन्यांहून अधिक काळापासून हे शेतकरी आंदोलक राजधानी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी आपली सगळी शक्ती पणाला लावलीय. याच पार्श्वभूमीवर, विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. रस्त्यापासून ते संसदेपर्यंत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून मोदी सरकारला घेरण्याची तयारी करण्यात आलीय. सोमवारी, टिकरी सीमेवर सिमेंट ब्लॉकसहीत एक मोठी भिंत उभारण्यात आलीय तसंच बॅरिकेडिंगचे सात थर लावण्यात आले आहे. इतकंच नाही तर दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्ता खोदून अणकुचिदार, लांब खिळे आणि टोकदार सळया बसवण्यात आल्या आहेत. सीमेवर रोड रोलरदेखील दिसत आहेत. दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हे रोड रोलर रस्त्यात उभे केले जाऊ शकतात. या तणावपूर्ण परिस्थितीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार यांनी निशाणा साधलाय. 'एकसंध करा, भिंती उभारू नका' (Build Bridges, Not Walls) असं ट्विट राहुल गांधी यांनी मोदी सरकारला उद्देशून केलंय. दुसरीकडे, विरोधकांकडून संसदेतही आणि कृषी कायद्याच्या मुद्यावर चर्चेची मागणी केली जातेय. परंतु, राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडून यांनी मात्र विरोधकांची मागणी फेटाळून लावतानाच 'चर्चा अगोदरच झालीय, आता चर्चेची गरज नाही' असं म्हटलंय. मात्र चर्चेस नकार दिला जातोय. याचवरून मंगळवारी राज्यसभेचं कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आलंय. दीर्घकाळापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यांच्या मागण्यांवर संसदेत चर्चा होणं आवश्यक आहे. हिंसाचाराच्या नावाावर शेतकऱ्यांचं आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी खिळ्यांचा वापर केला जात आहे... जसं काही सीमेवर समोर शत्रूच उभे आहेत... अहंकार आणि हट्टीपणाचं राजकारण संपुष्टात यायला हवं, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी एका चॅनलशी बोलताना म्हटलंय.