
कानपूर: कानपूरमध्ये बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या मुलीचे शेजारी राहणाऱ्या तरुणाने केले. त्यानंतर तिला एका ठिकाणी डांबून ठेवले. तिथे सलग पाच दिवस तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला धमकावून दयनीय अवस्थेत तिच्या घराबाहेर फेकून पसार झाला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरण, बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. बिधनू पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन आझाद नगरमध्ये राहणाऱ्या मजुराची मुलगी १२ वीमध्ये शिकत आहे. गृहपयोगी वस्तू घेण्यासाठी २८ जानेवारीला ती बाजारात गेली होती. मात्र, ती बराच उशिर झाला तरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, सोमवारी रात्री मुलगी घराबाहेर बेशुद्धावस्थेत सापडली. तिची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे रात्री तिला याबाबत विचारणा केली नाही. सकाळी ती शुद्धीवर आली. तिने सांगितले की, बाजारातून घरी परतत असताना शेजारी राहणारा सागर राजपूत याने माझ्यासमोर कार उभी केली. मी घरी चाललो आहे असे सांगून त्याने तुलाही सोडतो असे म्हणाला. सागरने जबरदस्ती मला कारमध्ये बसवले. त्यानंतर एका ठिकाणी घेऊन गेला. तिथे डांबून सलग पाच दिवस माझ्यावर बलात्कार केला. विरोध केल्यावर तो मारहाण करत होता, अशी आपबीती तिने सांगितली. बिधनूचे पोलीस निरीक्षक विनोद कुमार सिंह यांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने घरी येऊन आपल्या वडिलांना सर्व हकिकत सांगितली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पॉक्सो, बलात्कार आणि अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.