
म. टा. प्रतिनिधी, राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी महापालिकेत जाऊन विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनीही दंड थोपटले आहेत. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्ता 'खेचून' आणणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यासाठी पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या २३ गावांच्या समावेशाची प्रक्रिया 'योग्य' वेळी पूर्ण केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ( on ) वाचा: माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने पुणे महापालिकेत जाऊन विकासकामांचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी महापालिकेची निवडणूक ही स्वबळावर लढविण्यात येणार असल्याचे जाहीर करून महापालिकेवर पुन्हा सत्ता येण्याची खात्री दर्शविली. याबाबत पवार म्हणाले, 'सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत येणारच असे म्हणत असतो, तर विरोधी पक्ष सत्ता खेचून घेणार, असे म्हणतात. तसे मीदेखील म्हणतो, की पुणे महापालिकेवर सत्ता 'खेचून' आणणार.' नगरसेवकही 'खेचून' आणणार का, या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले 'सगळे करणार. यापूर्वी पक्ष सोडून गेलेल्यांचा विचार करून एक-एक पाऊल उचलले जाणार आहे. मात्र, कोण निवडून येऊ शकतो, हे पाहूनच निर्णय घेण्यात येणार आहेत.' वाचा: महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून महापालिकेत २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. ही प्रक्रिया केव्हा पूर्ण होईल, याबाबत पवार म्हणाले, 'गावे समाविष्ट करण्यापूर्वी हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. तो कालावधी संपल्यानंतर 'योग्य' वेळी गावे महापालिकेत समाविष्ट होतील.' 'चौकशीनंतर सत्य बाहेर येईल' राज्यातील एका मंत्र्यांच्या प्रेमसंबंधातून पुण्यात तरुणीने आत्महत्या केल्याचे आरोप करण्यात येत आहेत. याबाबत पवार म्हणाले, 'आत्महत्या झाल्यानंतर प्रत्येक प्रकरणाची चौकशी होते. या प्रकरणाचीही चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल. मात्र, विरोधी पक्षांना सध्या काही काम नाही.' 'राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्धही आरोप करण्यात आले होते. त्या प्रकरणात संबंधित महिलेने तक्रार मागे घेतली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता तक्रार मागे घेतल्याचे संबंधित महिलेने सांगितले आहे.' वाचा: