सिलिंडरने गाठला उच्चांकी स्तर ; दहा दिवसांत दुसऱ्यांदा गॅस सिलिंडर महागला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 26, 2021

सिलिंडरने गाठला उच्चांकी स्तर ; दहा दिवसांत दुसऱ्यांदा गॅस सिलिंडर महागला

https://ift.tt/3aTk0Qr
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलमधील महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे. केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत गुरुवारी २५ रुपयांची वाढ केली आहे. दहा दिवसांत दुसऱ्यांदा असून तो ७९४ रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला आहे. ही दरवाढ अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडरवर करण्यात आल्याचे पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे. या दरवाढीची २८ कोटी ७० लाख एलपीजी ग्राहकांना झळ बसणार आहे. केंद्र सरकारने गुरुवारी घरगुती वापराचा गॅस सिलिंडर (LPG price hiked by Rs. 25 Per Cylinder) वाढ केली आहे. दहा दिवसांत सिलिंडर पाऊणशे रुपयांनी महागला आहे. या आधी १५ फेब्रुवारी रोजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला होता. मुंबईत गॅस सिलिंडरसाठी आता ग्राहकांना ७९४ रुपये मोजावे लागतील. याआधी सिलिंडरचा भाव ७६९ रुपये होता. दरम्यान, डिसेंबरनंतर गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली ही पाचवी दरवाढ आहे. याआधी एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा भाव ७८९.५० रुपयांपर्यंत वाढला होता. त्यानंतर पहिल्यांदाच सिलिंडरच्या किमतींनी उच्चांकी स्तर गाठला आहे. करोना रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमध्ये देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज इंधन दर निश्चित केले जातात. तर गॅस सिलिंडरच्या किमतीचा दर १५ दिवसांनंतर किंवा महिनाभराने आढावा घेतला जातो. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि चलन विनिमय यानुसार कंपन्या किरकोळ विक्रीसाठी इंधन दर निश्चित करतात. मुंबईत गॅस खरेदीसाठी ग्राहकांना ७९४ रुपये मोजावे लागतील. त्यामध्ये २५ रुपयांची वाढ होणार आहे. सध्या १४ किलोचा (अनुदानीत) गॅस सिलिंडरची किंमत ७६९ रुपये आहे. त्यात गुरुवारपासून २५ रुपयांची वाढ होणार आहे. एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा दर ७८९.५० रुपयांवर पोहोचला होता. त्यावेळी सिलिंडर आठशे रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोनशे रुपयांची कपात करण्यात आली होती.मात्र डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी तीन वेळा दरवाढ गॅस सिलिंडरच्या किमतीत डिसेंबरपासून वाढ होतआहे. १ डिसेंबर २०२० रोजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १६ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा सिलिंडर ५० रुपयांनी महागले. त्यानंतर ४ फेब्रुवारी विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा १६ फेब्रुवारी रोजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला होता तर २५ फेब्रुवारी रोजी सिलिंडरमध्ये २५ रुपयांची वाढ करण्यात आली.