अमेरिकेचा सीरियावर एअर स्ट्राइक; बंडखोरांच्या ठिकाणांवर हल्ले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 26, 2021

अमेरिकेचा सीरियावर एअर स्ट्राइक; बंडखोरांच्या ठिकाणांवर हल्ले

https://ift.tt/3syef0P
दमिश्क: अमेरिकेने सीरियामध्ये इराणचा पाठिंबा असलेल्या मिलिशियाच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ला केला. काही दिवसांपूर्वी इराकमधील अमेरिकन दूतावासावर रॉकेट हल्ला झाला होता. हा हल्ला या मिलिशिया गटाने केला असल्याचे बोलले जाते. या रॉकेट हल्ल्यात अमेरिकन सैनिक जखमी झाले होते. तर, एका कंत्राटदाराचा मृत्यू झाला होता. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर हा अमेरिकेने केलेला पहिलाच हल्ला आहे. सीरियामध्ये झालेली कारवाई एका भागापुरतीच मर्यादीत ठेवत तणावात आणखी भर पडणार नाही याकडे अमेरिकेने लक्ष दिले असल्याचे म्हटले जाते. वाचा: अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, या सैन्य कारवाईतून राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी स्पष्ट संदेश दिला आहे. अमेरिका आपल्या मित्र देशांच्या सैन्यांची संरक्षण करेल. ही कारवाई संबंधित मित्र देशांसोबत चर्चा करून करण्यात आली असल्याचे पेंटागॉनने सांगितले. मागील काही वर्षात अमेरिकेने अनेकवेळेस प्रत्युत्तरात सैन्य कारवाई केली आहे. वाचा: इराण आणि अमेरिकेमध्ये २०१५ मध्ये झालेला अणूकरार पुन्हा एकदा लागू करण्याच्या दिशेने चर्चा सुरू असताना इराकमधील अमेरिकन दूतावासावर रॉकेट हल्ला झाला.