नफावसुली ; शेअर बाजारात विक्रीचा जोर, सेन्सेक्स-निफ्टी घसरले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 17, 2021

नफावसुली ; शेअर बाजारात विक्रीचा जोर, सेन्सेक्स-निफ्टी घसरले

https://ift.tt/3rX9BsT
मुंबई : मागील दोन आठवडे तेजीची नवनवीन शिखरे सर करणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीत आज गुंतवणूकदारांनी नफावसुली केली आहे. आज बुधवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ३०० अंकांनी तर निफ्टीत ८० अंकांची घसरण झाली. आज सलग दुसऱ्या सत्रात भांडवली बाजारात घसरण झाली आहे. मंगळवारी सेन्सेक्स ५० अंकांच्या घसरणीसह ५२१०४ अंकावर स्थिरावला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५३१३ अंकांवर बंद झाला. त्यात १.२५ अंकांची किरकोळ घसरण झाली होती. सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांचे लवकरच खासगीकरण केले जाणार आहे. त्याचे पडसाद या संभाव्य बँकाच्या शेअरवर उमटले. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे शेअर आज दुसऱ्या दिवशी तेजीत आहे. मंगळवारी या चारही बँकांच्या शेअरमध्ये १५ ते २० टक्के उसळी दिसून आली होती. सध्या बाजारात सेन्सेक्स मंचावरील ११ शेअर तेजीत आहेत. तर १९ शेअर घसरले आहेत. ज्यात आयटीसी, एल अँड टी, कोटक महिंद्रा बँक, टायटन, मारुती, एचसीएल टेक, टीसीएस, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, एचडीएफसी, एचयूएल या शेअरचा समावेश आहे. बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा या शेअरमध्ये तेजी आहे. सध्या सेन्सेक्स ३०४ अंकांनी कोसळला असून तो ५१७९९ अंकांवर आहे. तर निफ्टी ७५ अंकांच्या घसरणीसह १५२३७ अंकावर ट्रेड करत आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भारतीय बाजारातील गुंतवणुकीचा ओघ कायम आहे. मंगळवारी एफआयआयने ११४४ कोटीची गुंतवणूक केली. तर दुसऱ्या बाजूला स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १५५९ कोटीचे शेअर विक्री केले. आशियातील भांडवली बाजारात आज नकारात्मक वातावरण आहे. सिंगापूर निफ्टीने नकारात्मक सुरुवात केली आहे. जपानच्या निक्केई आणि हाँग काँगच्या हँगसेंग निर्देशांकात घसरण झाली आहे.