डोक्यात डंबल्स घालून पत्नीची हत्या; मृतदेहाजवळ दोन्ही मुले दिवसभर होती बसून - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 17, 2021

डोक्यात डंबल्स घालून पत्नीची हत्या; मृतदेहाजवळ दोन्ही मुले दिवसभर होती बसून

https://ift.tt/3dhNNnG
औरंगाबाद: घरगुती वादानंतर संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात डंबल्स घालून तिची हत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १६) रात्री उघडकीस आली. पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह खोलीत ठेवला. त्या खोलीत दोन्ही मुलांना कोंडून पती पसार झाला. पिसादेवी परिसरात राहणाऱ्या सिद्धेश त्रिवेदी आणि त्याची पत्नी कविता यांच्यामध्ये मंगळवारी पहाटे आठच्या सुमारास वाद झाला. या वादातून संतापलेल्या सिद्धेश त्रिवेदी याने पत्नीच्या डोक्यात व्यायामासाठी आणलेले आठ किलो वजनाचे डंबल्स घातले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. आठ वर्षांचा मुलगा व चार वर्षांच्या मुलीला घरात कोंडून सिद्धेश त्रिवेदी हा पसार झाला. मुलेही आईच्या मृतदेहाच्या शेजारीच दिवसभर बसून होते. दिवसभरापासून घर उघडले नाही, घराला कुलूप असताना आतून रडण्याचा आवाज येत असल्याने शेजाऱ्याने खिडकीतून डोकावून पाहिले. मुले रडत असल्याच्या त्याला आवाज आला. त्याने दार तोडून मुलांना बाहेर काढले. तेव्हा कविता त्रिवेदी यांची हत्या झाल्याचे समोर आले. परिसरातील नागरिकांनी तातडीने चिकलठाणा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. मुलांच्या जबाबावरून कविता हिची पती सिद्धेश त्रिवेदी यानेच हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळी ग्रामिण पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. विशाल नेहुल, चिकलठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली असून, आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.