मुंबई: तरूण कामावर निघाला होता, घडली भयानक घटना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, February 9, 2021

मुंबई: तरूण कामावर निघाला होता, घडली भयानक घटना

https://ift.tt/3rBCgn3
मुंबई: मुंबईतील चेंबूर येथे एक धक्कादायक घटना घडली. रुग्णालयात कामावर जात असताना, २५ वर्षीय तरुणावर तिघा जणांनी प्राणघातक हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रफुल्ल सवणे (वय २५) असे जखमी तरुणाचे नाव आहे. काल, सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तो मुंबईत कामावर निघाला होता. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीजवळ अंकूर गार्डन परिसरात त्याच्यावर तिघा जणांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राने त्याच्या पाठीवर, डोक्यावर हातावर वार केले. दिवा येथे वास्तव्यास असलेल्या प्रफुल्ल सवणे यांच्या पत्नीने या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रफुल्ल सवणेच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तिघांचाही शोध घेण्यात येत आहे.