
चेन्नई: इंग्लंडविरुद्ध आजपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. मालिकेसाठी संघात निवड झालेला अष्ठपैलू पहिल्या कसोटीतून बाहेर झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी नाणेफेक होण्याआधी काही तास आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने याची माहिती दिली. वाचा- पहिल्या कसोटी सामन्यात अक्षर पटेल कसोटीत पदार्पण करण्याची शक्यता होती. कर्णधार विराट कोहलीने देखील गोलंदाज अष्ठपैलूना संधी दिली जाईल असे स्पष्ट केले होते. संघात रविंद्र जडेजा नसल्यामुळे अक्षर पटेल त्याच्या जागी योग्य होता. पण दुखापतीमुळे तो पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. बीसीसीआयने शाहबाद नदीम आणि राहुल चाहर यांचा संघात समावेश केला आहे. हे दोन्ही खेळाडू स्टॅड बाय म्हणून संघा सोबत सराव करतील, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. वाचा- पहिल्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह,शाहबाद नदीम