
चेन्नई: भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना चेन्नईत सुरू आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली असून भारतीय संघावरील फॉलोऑनचे संकट अद्याप गेलेले नाही. आघाडीच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यात अपयश आल्यानंतर पुजारा आणि पंत यांनी भारताचा डाव सावरला. आता आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर ही अखेरची फलंदाजांची जोडी मैदानावर आहे. live अपडेट ( )>> भारताची नववी विकेट, इशांत शर्मा ४ धावांवर बाद >> नदीम बाद, भारत ८ बाद ३१२ >> अश्विन आणि सुंदर यांची सातव्या विकेटसाठी ८० धावांची भगिदारी >> भारताची सातवी विकेट, आर अश्विन बाद- भारत ७ बाद ३०५>> भारताच्या ३०० धावा पूर्ण >> वॉशिंग्टन सुंदरचे अर्धशतक, कसोटी क्रिकेट मधील सलग दुसरे अर्धशतक >> चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात