'मुन्नाभाई MBBS'साठी संजय दत्त नव्हे तर 'हा' अभिनेता होता पहिली पसंती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, February 2, 2021

'मुन्नाभाई MBBS'साठी संजय दत्त नव्हे तर 'हा' अभिनेता होता पहिली पसंती

https://ift.tt/3pE4ZqI
मुंबई: हा बॉलीवूड मधला उत्कृष्ट व लोकप्रिय अभिनेता. आपल्या जबरदस्त अभिनय शैलीने त्याने आपल्या चाहत्यांची मने जिंकली. प्रत्येक वेळेस आपल्या दमदार भूमिकेने त्याने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित '' या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचं प्रचंड कौतुकही झालं. पण या चित्रपटासाठी राजकुमार हिरानी यांची पहिली पसंती संजय दत्त याला नव्हतीच. 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटातील मुन्नाच्या' भूमिकेसाठी आधी विवेक ओबेरॉयची निवड करण्यात आली होती. याने स्वतः एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे. 'कंपनी' या चित्रपटातील विवेकची भूमिका पाहून राजकुमार हिरानी यांनी त्याला ही भूमिका देऊ केली होती. परंतु त्याच्या व्यस्त शेड्युलमधून या चित्रपटासाठी तारखा देणे त्याला शक्य झाले नाही. त्यानंतर संजय दत्तला या भूमिकेबद्दल विचारणा करण्यात आली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. शिवाय या चित्रपटासाठी संजय दत्तला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. फिल्मफेअर मिळल्यानंतर '' ची घोषणा करण्यात आली. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय दत्त लवकरच दाक्षिणात्य अभिनेता यश आणि रविना टंडन यांसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय तो रणबीर कपूर आणि वाणी कपूर सोबत '' या चित्रपटातदेखील झळकणार आहे.