अल्पवयीन मुलावर बलात्कार प्रकरणी महिलेला अटक; पीडित मुलापासून दिवस गेले! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 6, 2021

अल्पवयीन मुलावर बलात्कार प्रकरणी महिलेला अटक; पीडित मुलापासून दिवस गेले!

https://ift.tt/3blbSIP
वॉशिंग्टन: अमेरिकेत एका अल्पवयीन केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. मात्र, अटकेनंतर या मुलापासून दिवस गेले असल्याची महिलेने पोलिसांनी सांगितले. जवळपास वर्षभरापूर्वी आरोपी महिलेने एका १४ वर्षीय मुलावर बलात्कार केला होता. गरोदर असल्याच्या दाव्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. 'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, बलात्काराच्या या घटनेच्या एका वर्षानंतर आरोपी महिलेने हे कृत्य केल्यानंतर ती गरोदर झाली असल्याचे पोलिसांना एका साक्षीदारानं सांगितले. लैंगिक अत्याचाराचे हे प्रकरण एका व्यक्तीने उघडकीस आणले. बाल अत्याचार आयोगाला संपर्क साधून या व्यक्तीने ब्रिटनी ग्रे या महिलेची तक्रार केली होती. त्याने सांगितलं की, ब्रिटनी ग्रे नावाच्या महिलेचे १४ वर्षांच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. एक वर्षाहून अधिक काळ या मुलाचे लैंगिक शोषण सुरू असल्याचे तक्रारदार व्यक्तीने म्हटले. वाचा: मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात या महिलेने मुलावर बलात्कार केला असल्याचे आपण स्वत: पाहिले असल्याचे या व्यक्तीने म्हटले. एक वर्षाहून अधिक काळ त्यांच्यात संबंध असल्याचेही त्याने सांगितले. आरोपी ब्रिटनी ही त्या पीडित मुलाच्या बाळाची आई होणार आहे. वाचा: वृत्तानुसार, ही महिला गर्भवती असल्याची पुष्टी पोलिसांनी देखील केली आहे. या आरोपी महिलेला एक मार्च रोजी अटक करण्यात आली. गुरुवारी तिने ५००० हजार डॉलर्सचा बॉण्ड भरल्यानंतर तिची तुरुंगातून सुटका करण्यात आली. आता या महिलेला २३ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे.