वाढत्या तापमानामुळे लसीकरणावर परिणाम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 31, 2021

वाढत्या तापमानामुळे लसीकरणावर परिणाम

https://ift.tt/2QKDejG
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मागील आठवड्यापासून वाढलेला उष्मा आणि संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे लसीकरणाच्या वेगावर परिणाम झाल्याचे निरीक्षण प्रत्यक्ष केंद्रावर काम करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक दिवशी एक लाख व्यक्तीचे करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे होते. यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून तापमानातील वाढलेला उष्मा आणि संसर्गाच्या प्रमाणामध्ये वेगाने वाढ होत असल्यामुळे लसीकरणाचा वेग काहीसा मंदावला होता. शनिवारी रविवार धुलीवंदनाच्या सुटीमुळेही काही केंद्रांमध्ये लसीकरण करण्यात आले नाही. सार्वजनिक सुटीच्या दिवशी लसीकरणाचा वेग कमी होत असल्याचा अनुभव पालिकेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र एक एप्रिलपासून ४५ वयोगटावरील व्यक्तींमध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हा वेग वाढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोव्हिशील्डचे दहा लाखांहून अधिक लाभार्थ्यांना डोस देण्यात आले असून कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांची संख्या ८२ हजारांहून अधिक आहे. लसीकरण केंद्राचे समन्वयक डॉ. आर.आर. जगताप यांनी काही लसीकरण केंद्राच्या बाहेर उन्हापासून संरक्षण करणारी व्यवस्था नाही. असह्य उकाड्यामुळे प्रमाण कमी झाले आहे. पश्चिम उपनगरामध्ये नायर तर पूर्व उपनगरामध्ये राजावाडी रुग्णालयाला लसीकरणासाठी प्राधान्य दिले जाते. त्यामुळे काही ठराविक केंद्रामध्ये गर्दी होण्याचे प्रमाण अधिक आहे. लसीकरण केंद्रांची उपलब्धतेसंदर्भात सामान्यांना सातत्याने माहिती दिली तर उत्साह वाढण्यासाठी मदत होईल. उष्म्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढते का, असाही प्रश्न लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे.