
मुंबई- हिने जेव्हा बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण तिचे हिंदीचे उच्चारण आणि एकूणच अभिनय यथातथाच असल्याने तिचे करिअर फार काळ चालणार नाही असे अंदाज व्यक्त करण्यात आले होते. परंतु तिने स्वतःवर खूप मेहनत घेत सुधारणा घडवून आणली. आणि आता ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक झाली आहे. आता कतरिनाची लहान बहिण ही देखील तिच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये येत आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीमध्ये इसाबेल हिंदी सिनेमात काम करण्यासाठी कोणकोणती मेहनत घेत आहे याबद्दल बोलताना दिसली. इसाबेल म्हणाली की, 'मी गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे. ही भाषा हळूहळू मला बोलता येऊ लागली आहे. कोणतीही भाषा शिकायची म्हटली की त्याला काही दिवस लागतातच, तसाच वेळ मलाही लागत आहे. हिंदी भाषेवर मला प्रभुत्व मिळवायचं आहे. त्यासाठी लागणारी मेहनत मी घेत आहे. आधीपेक्षा माझं हिंदी बोलणं खूपच सुधारले आहे आणि मला खात्री आहे, की लवकरच चांगल्या पद्धतीने हिंदी बोलू शकेन.' कतरिना करते आहे मदत याच मुलाखतीमध्ये इसाबेला हिने आपल्या बहिणीबद्दलच्या तिच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली ' मी तिच्यापासूनच प्रेरणा घेतली आहे. लहानपणापासून मी डान्सर आहे आणि मी जेव्हा तिला अभिनय करताना बघते तेव्हा माझ्या अभिनयात अधिक सुधारणा करण्याची गरज असल्याचे जाणवते. तिला पाहूनच मी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. ते करत असतानाच अभिनयाची मला आवड लागली आणि ती मी आता जोपासत आहे. लहान असल्यापासूनच मला सादरीकरण करायला खूप आवडते. कतरिनाला काम करताना पाहून माझ्यातील हा उत्साह अधिकच वाढतो आणि तिच्यासारखे चांगले काम करण्याची प्रेरणा मला मिळते.'