ओटीटीवर पदार्पणासाठी आलिया सज्ज, वेब सीरिजमध्ये साकारणार भूमिका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 19, 2021

ओटीटीवर पदार्पणासाठी आलिया सज्ज, वेब सीरिजमध्ये साकारणार भूमिका

https://ift.tt/3cIB1g2
मुंबई- बॉलिवूडमधील सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये आलिया भट्टच नाव आवर्जुन घेतलं जातं. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. प्रेक्षकांमध्ये सध्या आलियाची प्रचंड चर्चा सुरू आहे. तिच्या चाहत्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ती सध्या तिचा आगामी 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर आलियावर प्रेक्षकच नाही तर अनेक कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यात ती अत्यंत सुंदर आणि हटके अंदाज दिसली होती. तिच्या अभिनयाचं सगळ्यांनी कौतुक केलं होतं. यानंतर आता आलिया ओटीटीवर पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येतेय. 'गंगुबाई काठियावाडी' नंतर दिग्दर्शक आणि निर्माते यांनी आलियाला त्यांचा पुढील प्रोजेक्ट देऊ केला आहे. त्यांचा दुसरा प्रोजेक्ट एक वेबसीरिज असून संजय त्यावर मागील अनेक वर्ष काम करत आहेत. वेळेच्या अभावामुळे ते या वेबसीरिजच्या कथेचं काम पूर्ण करू शकले नव्हते. परंतु,आता 'गंगुबाई काठियावाडी' च्या चित्रीकरणानंतर ते या वेबसीरिजकडे वळणार आहेत. या वेबसीरिजचं नाव '' असून यात मुख्य भूमिकेसाठी संजय यांनी आलियाची निवड केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एके काळी संजय फक्त ऐश्वर्या राय सोबत चित्रपट बनवत असत. तसेच ते आता आलियासोबत चित्रपट बनवत आहेत. याच प्रकारे त्यांनी दीपिका पादुकोनसोबतही 'राम- लीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' सारखे हिट चित्रपट बनवले होते. दुसरीकडे आलियाच्या 'गंगुबाई काठियावाडी' वरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. पूर्वी या चित्रपटाला विरोध होत होता त्यानंतर आता चित्रपटाच्या नावाला विरोध होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नेते अमीन पटेल यांनी चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे काठियावाडी भागाचं नाव खराब होण्याची शक्यता होती. हा चित्रपट ३० जुलै २०२१ रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.