'महानिर्मिती'नं रचला इतिहास; ६० वर्षांत प्रथमच 'इतकी' वीज निर्मिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 10, 2021

'महानिर्मिती'नं रचला इतिहास; ६० वर्षांत प्रथमच 'इतकी' वीज निर्मिती

https://ift.tt/2OzoBia
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई देशातील एक अग्रगण्य वीजनिर्मिती कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या ''ने मंगळवारी दुपारी ४.४० वाजता एकूण १०,४४५ मेगावॉट वीजनिर्मिती करून औष्णिक वीजनिर्मितीमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. वीजनिर्मितीमध्ये कोळसा व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचे असते. डॉ. राऊत यांनी ऊर्जामंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील औष्णिक वीजकेंद्राची उत्पादन क्षमता अर्थात प्लाण्ट लोड फॅक्टर वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले. राज्य वीज नियामक आयोगाने वीजकेंद्रांची उत्पादन क्षमता किमान ८५ टक्के असायला हवी, असे बंधन घातले आहे. डॉ. राऊत यांनी ही क्षमता किमान ९५ टक्के गाठण्याचे लक्ष्य महानिर्मितीला आखून दिले. त्यानुसार कालबद्ध कार्यक्रम आखून त्यांनी वेळोवेळी आढावा घेतला. गुणवत्तापूर्ण कोळसा न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देऊन कमी गुणवत्तेच्या कोळशामुळे वीजनिर्मिती क्षमतेतील घट थांबविण्याचा प्रयत्न केला. वाचा: ६ जानेवारी २०२० रोजी महानिर्मितीचे एकूण वीज उत्पादन ६ हजार ८२१ मेगावॉट होते. यात ४ हजार ८०४ मेगावॉट औष्णिक वीज निर्मितीचा समावेश होता. मंगळवारी एकूण वीज उत्पादन १० हजार ४४५ मेगावॉट असून यात ७ हजार ९९१ मेगावॉट औष्णिक विजेचा समावेश आहे. वर्षभरात औष्णिक वीजउत्पादन जवळपास दुपटीने वाढले आहे तर एकूण वीज उत्पादन हे जवळपास ४ हजार मेगावॉटने वाढले आहे. ऊर्जामंत्र्यांकडून अभिनंदन महानिर्मितीने राज्याच्या इतिहासात एका दिवसात सर्वाधिक वीजनिर्मितीचा विक्रम रचला याचा मला खूप आनंद होत आहे. हा इतिहास रचणारे महानिर्मितीतील सर्व अधिकारी, तंत्रज्ञ यांचे विशेष अभिनंदन करतो, अशा शब्दांत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी कौतुक केले. वीज निर्मितीसाठी प्रभावी इंधन व्यवस्थापन, इंधनाचा आवश्यक तो साठा करणे, वीजनिर्मिती संचात बिघाड झाल्यावर लगेच दुरुस्ती करणे आणि संचात बिघाड होण्याची वेळच येणार नाही अशा पद्धतीने ऑपरेशन आणि मेंटेनन्स करणे यावर आम्ही सातत्याने भर देत आहोत. याशिवाय वीज उत्पादन खर्च कमी करण्याचेही प्रयत्न करीत आहोत. त्याचे सुखद परिणाम आता दिसू लागले आहेत," असेही ते म्हणाले. महानिर्मितीचा चढता आलेख मार्च महिन्यात राज्य सरकारच्या महानिर्मिती कंपनीची कामगिरी अधिकाधिक उंचावत आहे. ५ मार्च रोजी राज्यातील ९औष्णिक वीज निर्मिती केंद्रांनी किमान ९० टक्के वा त्याहून अधिक प्लांटलोड फॅक्टर प्राप्त करून विक्रम रचला. यापूर्वीचा २० मे २०१९चा १०,०९८ मेगावॉटचा उच्चांक मोडताना महानिर्मितीने आधी १०,२७५ मेगावॉट वीजनिर्मिती साध्य केली व त्यात सातत्य राखत दुपारी ४.४० वाजता स्वतःचाच विक्रम मोडून १०,४४५ मेगावॉट वीजनिर्मितीची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यामध्ये औष्णिक वीजनिर्मितीद्वारे ७९९१ मेगावॉट, वायू वीजनिर्मिती केंद्राद्वारे २६४ मेगावॉट, जलविद्युत केंद्राद्वारे २१३८ मेगावॉट आणि सौर ऊर्जा प्रकल्पामधून ५० मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. यावेळी महावितरणची विजेची मागणी २२१२९ मेगावॉट होती तसेच राज्याची एकूण वीजनिर्मिती १६४२९ मेगावॉट इतकी होती. १०,००० पेक्षा जास्त वीजनिर्मितीचा आकडा पुन्हा गाठण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. ८ मार्चलाही महानिर्मितीने १०,०९७ मेगावॉट निर्मिती साध्य केली होती. वाचा: