पश्चिम बंगाल : भाजपच्या १५७ उमेदवारांच्या यादीत आठ मुस्लीम नेत्यांचा समावेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 19, 2021

पश्चिम बंगाल : भाजपच्या १५७ उमेदवारांच्या यादीत आठ मुस्लीम नेत्यांचा समावेश

https://ift.tt/3s0wqMA
नवी दिल्ली : साठी भारतीय जनता पक्षाकडून आपल्या १५७ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या टप्प्यांसाठी ही नावांची यादी घोषित करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून आठ ांनाही संधी देण्यात आलीय. यादी जाहीर झाल्यानंतर लगेचच भाजपमधील धूसपूरही बाहेर पडताना दिसून येतेय. मुकुल रॉयही मैदानात घोषित करण्यात आलेल्या यादीत मुकुल रॉय, खासदार यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजपच्या वतीनं नदिया जिल्ह्यातील कृष्णानगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जातील. तृणमूल काँग्रेसचे माजी नेते मुकुल रॉय यांनी रेल्वे मंत्री म्हणूनही जबाबदारी हाताळली आहे. रानाघाटचे खासदार जगन्नाथ सरकार आता शांतिपूर विधानसभेतून निवडणूक लढणार आहे. भाजपनं विधानसभा निवडणुकीत पाच खासदारांनाही तिकीट दिलंय. ज्येष्ठ नेते राहुल सिन्हा हे हाबडा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरतील. भाजपचे आठ मुस्लीम उमेदवार पक्षानं आठ मुस्लीम उमेदवारांना संधी दिलीय. भाजपनं चोपडा मतदारसंघातून मोहम्मद शाहीन अख्तर, गोलपोखर मतदारसंघातून गुलाम सरवार, हरिश्चचंद्रपूरहून अतीउर रहमान, साकरदिघी मतदारसंघातून माफूजा खातून, भागवांगोला मतदारसंघातून महबूब आलम, रानीनगर मतदारसंघातून मसुहारात खातून, डोमकल मतदारसंघातून रुबिया खातून आणि सुजापूर मतदारसंघातून एस के जियादुद्दीन यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेस नेत्याच्या पत्नीला उमेदवारी माजी काँग्रेस नेते यांची पत्नी यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिखा यांना कोलकाताच्या चौरिंघी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय. यापूर्वी त्या याच मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढल्या होत्या. सेलिब्रिटींचाही सहभाग पक्षाकडून कलाकार, खेळ जगत आणि सिने जगतातील काही प्रसिद्ध व्यक्तींनाही निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलंय. लोक कलाकार असीम सरकार यांना नदिया जिल्ह्यातील हरिंगाता मतदारसंघातून संधी देण्यात आलीय. तर वैज्ञानिक गोवर्धन दास याना पूर्वास्थली उत्तर मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय. अमित शहांवर पुस्तक लिहिणारे अनिर्बान गांगुली बोलपूर विधानसभा मतदारसंघातून, फुटबॉलर कल्याण चौबे मनिकटाला आणि अभिनेते रुद्रनिल घोष भवानीपूर मतदारसंघातून निवडणुकाला सामोरे जाणार आहेत.