नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डा () ने निवडलेल्या संघावर कर्णधार () नाराज आहे. बाबरने संघ निवडताना काही सूचना केल्या होत्या. पण निवड समिती प्रमुख मोहम्मद वसीम (Mohammad Wasim) यांनी बाबरच्या सूचना विचारत न घेता संघ निवडला. वाचा- संघ निवड हा मुद्दा सध्या पाकिस्तान क्रिकेटमध्ये चर्चेला जात आहे. अशात माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरने बाबरला एक खास सल्ला दिला आहे. वाचा- जर बाबरचा सल्ला ऐकत नसेल त्याने राजीनामा दिला पाहिजे. एका मुलाखतीत अख्तर म्हणाला, मी ऐकले आहे की बाबर आझमने संघाबाबत दिलेल्या सूचना बोर्डाने ऐकल्या नाहीत. हे सर्व जर खरे असेल आणि बाबरला एक चांगला खेळाडू व्हायचे असेल तर त्याने कर्णधारपद सोडावे. बाबरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एक मेसेज दिला पाहिजे. जर त्याने तसे केले नाही तर त्याची अवस्था माजी कर्णधार सरफराज सारखी होईल. तो सरफराज-२ होईल. वाचा- ... याआधी माजी कर्णधार, प्रशिक्षक आणि मुख्य निवड समिती प्रमुख असलेल्या इंझमाम उल हकने मुख्य निवड समिती प्रमुखाला कर्णधाराचे मत न ऐकल्याबद्दल सुनावले होते. वाचा- संघाची निवड ही कर्णधारासोबतच्या चर्चेनंतर केली जाते. मी अनेक वेळा सांगितले आहे आणि आता पुन्हा सांगतोय की, सर्वात महत्त्वाचा खेळाडू कर्णधार असतो. संघ निवडताना मुख्य निवड समिती प्रमुख आणि कोच यांचा देखील समावेश असतो, असे इंझमामने म्हटले.