धक्कादायक! मुंबईत २२ वर्षीय तरुणीला पूर्वाश्रमीच्या प्रियकराने भररस्त्यात भोसकले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 1, 2021

धक्कादायक! मुंबईत २२ वर्षीय तरुणीला पूर्वाश्रमीच्या प्रियकराने भररस्त्यात भोसकले

https://ift.tt/3bJopEW
मुंबई: मुंबईतील परिसरात भररस्त्यात २६ वर्षीय तरुणाने आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला चाकूने भोसकले. शनिवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. आरोपी तरुणाला अटक केली आहे. तरुणीने प्रेमसंबंध पुढेही सुरू ठेवण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले. तरुणीच्या घरापासून अवघ्या १०० मीटरवर ही धक्कादायक घटना घडली. तरुणी आपल्या घरी पायी जात होती. त्याचवेळी तरुणाने तिला चाकूने भोसकले. तिला तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारासाठी तिला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. रविवारी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अर्जुन सिंह असे आरोपीचे नाव असून, तो रविवारी सकाळी साकिनाका पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी सिंह हा कुर्ला येथे राहत होता. चार वर्षांपूर्वी तरुणी आणि त्याचे प्रेमसंबंध होते. इतकेच नाही तर तरुणी त्याच्याकडे राहायला गेली. वर्षभर ते एकत्रित राहिले. अर्जुनला दारूचे व्यसन होते. तसेच तो अंमली पदार्थही सेवन करायचा. त्याच्याकडे कायमस्वरूपी नोकरीही नव्हती. अखेर ती कंटाळून पुन्हा आपल्या पालकांकडे परतली. अर्जुन तिचा पाठलाग करू लागला. तिने घरी आपल्यासोबत परत यावे यासाठी तिच्यावर दबाव टाकू लागला. शनिवारी तो साकिनाक्यातील बेकरीजवळ तिची वाट पाहात होता. त्याने सोबत चाकू आणला होता. तरुणी एका कंपनीत काम करत होती. तिची येण्या-जाण्याची वेळ त्याला माहिती होती. साधारण साडेसहाच्या सुमारास ती घरी परतत होती. त्याचवेळी अर्जुनने तिला पकडले. तिला सोबत नेण्यासाठी जबरदस्ती करू लागला. तिने नकार दिल्यानंतर त्याला राग आला. माझ्यासोबत तुला यायचे नाही ना, तुला आज ठार मारतो, असे तो धमकावू लागला. काही वेळाने त्याने तिच्या पोटावर चाकूने वार केले. तिला वाचवण्यासाठी त्यावेळी कुणीही पुढे आले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी आरोपी अर्जुनला अटक केली आहे. त्याच्याविरोधात विनयभंग, पाठलाग करणे आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.