पंतप्रधान मोदींच्या लसीकरणाशी बंगाल, केरळ, पुदुच्चेरीचा असाही संबंध... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 1, 2021

पंतप्रधान मोदींच्या लसीकरणाशी बंगाल, केरळ, पुदुच्चेरीचा असाही संबंध...

https://ift.tt/3kwP8IR
नवी दिल्ली : देशभरात सुरु झालेल्या करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच दिवशी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होत करोना लसीचा पहिला डोस घेतला. या दरम्यानही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'निवडणूक संदेश' चर्चेत आहे. एप्रिल-मे महिन्यात , , , आणि इथं विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या पाचही निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी अर्थात २ मे रोजी जाहीर होणार आहेत. परिचारिका पुदुच्चेरी आणि केरळशी संबंधित उल्लेखनीय म्हणजे, आज सकाळीच करोना लसीकरणासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खांद्यावर आसामचं उपरणं घेतलं होतं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लस देणाऱ्या परिचारिका या पुदुच्चेरी आणि केरळशी संबंधित होत्या. आता हा योगायोग की आणखी काही? यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खांद्यावर घेतलेलं आसामचं उपरणं त्यांनी याअगोदरही अनेकदा वापरलेलं आहे. हे उपरणं नरेंद्र मोदींना आसामच्या महिलांकडून देण्यात आलं होतं. त्यांच्या आशीर्वादाचं हे प्रतिक असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं. 'तुम्ही कुठून आहात?', पंतप्रधानांचा परिचारिकांना प्रश्न तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचं नाव आहे पी. निवेदा... त्या पुदुच्चेरीच्या रहिवासी आहे. तर त्यांना सहाय्य करणाऱ्या परिचारिका रोसम्मा अनिल या मूळच्या केरळच्या आहेत. लसीकरणा दरम्यान पंतप्रधान मोदींनी उपस्थित स्टाफशी संवादही साधला. 'तुम्ही कुठून आहात?' असा प्रश्न विचारतानाच 'लस टोचलीही... आणि कळलंदेखील नाही' असं म्हटल्याचं नर्स पी निवेदा यांनी म्हटलंय. यावेळी, पंतप्रधान पश्चिम बंगालची वेशभूषेत दिसले. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींची लांब दाढी पश्चिम बंगालच्या लोकांना अनेकदा रविंद्र नाथ टागोर यांची आठवण करून देते. पंतप्रधानांकडून सर्व प्रोटोकॉलचं पालन : डॉ. गुलेरिया एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना लस घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रोटोकॉलचं पालन केलं. करोना लस देण्यापूर्वी पंतप्रधान मोदींना आवश्यक ती माहिती देण्यात आली. त्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्मही फरला. त्यानंतरच त्यांना करोना लस देण्यात आली. करोना लस घेतल्यानंतर अर्धा तास पंतप्रधानांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. त्यांच्यात कोणतेही साईड इफेक्ट दिसून आले नाहीत. त्यानंतर ते आपल्या कामाला परतले. पंतप्रधानांनी स्वत: लस घेऊन स्वदेशी लस सुरक्षित असल्याचाच संदेश दिला आहे, असं गुलेरिया यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीच्या 'कोव्हॅक्सिन'चा डोस देण्यात आला आहे. २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस पंतप्रधानांना देण्यात येणार आहे. विरोधकांकडून करोना लसीला आपत्कालीन मंजुरी देण्यावरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: लस घेत भारतीय बनावटीच्या लसीवर विश्वास व्यक्त केलाय. उल्लेखनीय म्हणजे, करोना लसीकरणा दरम्यान सामान्य नागरिकांना कोणती लस घ्यायची, याचा पर्याय देण्यात आलेला नाही.