
नेपाळ क्रिकेट टीमने रोहित पौडेल याच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. नेपाळ क्रिकेट टीमने शारजाह क्रिकेट स्टेडिममध्ये वेस्ट इंडिजवर दुसर्या सामन्यात 90 धावांच्या मोठ्या फरकाने मात केली आहे. वेस्ट इंडिजचा हा सलग दुसरा विजय ठरला. विंडीजने या दुसऱ्या विजयासह ऐतिहासिक कामगिरी करत मालिका जिंकली आहे. नेपाळने विंडीजसमोर 174 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र नेपाळच्या गोलंदाजांसमोर विंडीजने गुडघे टेकले. विंडीजला 17.1 ओव्हरमध्ये 83 धावांवर गुंडाळत नेपाळने लवकर सामना संपवला आणि मालिकेवर नाव कोरलं. नेपाळने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे.
मोहम्मद आदील आलम, आसिफ शेख आणि सुंदीप जोरा या तिघांनी नेपाळच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. आसिफ शेख आणि सुंदीप जोरा या जोडीने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे नेपाळला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 173 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर मोहम्मद आदील आलम याने 174 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या विंडीजला सर्वाधिक 4 झटके देत 83 वर गुंडाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. तसेच विंडीजच्या या विजयात इतर खेळाडूंनीही आपलं योगदान दिलं. या ऐतिहासिक विजयानंतर नेपाळमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे.