भारत काही धर्मशाळा नाही, रोहिंग्यांच्या प्रश्नावर अनिल वीज यांचं वक्तव्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 20, 2021

भारत काही धर्मशाळा नाही, रोहिंग्यांच्या प्रश्नावर अनिल वीज यांचं वक्तव्य

https://ift.tt/3r4ZyRI
चंदीगड : राज्यात आश्रय घेणाऱ्या मुस्लीम व्यक्तींबद्दल माहिती एकत्र केली जात आहे, असं हरयाणाचे गृहमंत्री यांनी शुक्रवारी म्हटलंय. सोबतच 'भारत काही धर्मशाळा नाही, जिथे कुणीही येऊन बस्तान मांडावं' असं वक्तव्यही वीज यांनी केलंय. उल्लेखनीय म्हणजे, जम्मूमध्ये अनधिकृतरित्या राहणाऱ्या १६८ रोहिंग्यांना तुरुंगात धाडण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती नुकतीच अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानंतर अनिल वीज यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं ठरतंय. गेल्या अनेक दिवसांपासून रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न चर्चेत आहे. रोहिंग्या शरणार्थींनी , हैदराबाद, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि राष्ट्रीय राजधानीत आश्रय घेतला आहे. हरयाणाच्या मेवातमध्येही रोहिंग्यांची उपस्थिती दिसून येत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी जम्मूमध्ये दोन रोहिंग्या व्यक्तींविरोधात 'बनावट' पासपोर्ट मिळवून फसवणुकीचा प्रकार दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूत राहणाऱ्या रोहिंग्या समुदायातील लोकांची ओळख पटवली जात आहे. याच दरम्यान दोन रोहिंग्या व्यक्तींकडे बनावट पासपोर्ट आढळून आला होता. रहमान आणि गफूर नावाच्या या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.