विश्वास बसणार नाही; या खेळाडूने चक्क धोनीच्या वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 20, 2021

विश्वास बसणार नाही; या खेळाडूने चक्क धोनीच्या वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी

https://ift.tt/3bZTpBT
अबूधाबी : अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात सध्या टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या टी-२० लढतीत अफगाणिस्तानने झिम्बाबेचा ४५ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजय आघाडी घेतली. वाचा- दुसऱ्या टी-२० लढतीत अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पाच बाद १९३ इतकी मोठी धावसंख्या उभी केली. करीम जेनतने ५३, उस्मान गनीने ४९ तर मोहम्मद नबीने ४० धावा केल्या. तर कर्णधार असगर अफगानने नाबाद १४ धावा केल्या. उत्तरादाखल झिम्बाब्वेचा संघ १७.१ षटकात १४८ धावांवर बाद झाला. वाचा- या सामन्यातील विजयासह अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगानने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्याने ७२ पैकी ४१ सामन्यात विजय मिळवला आहे. आता अफगानने या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने ५१ पैकी ४१ लडतीत विजय मिळवला आहे. वाचा- भारताचा कर्णधार धोनीला ७२ लढतीपैकी २८ मध्ये पराभव स्विकारावा लागला होता. तर अफगानला फक्त ९ सामन्यात पराभव स्विकारावा लागला. विजयाच्या टक्केवारीचा विचार केल्यास अफगान अव्वल स्थानी आहे. त्याची विजयाची टक्केवारी ८१.३७ इतकी आहे. तर धोनीची ५९.२८ इतकी आहे. वाचा- टी-२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार होण्यासाठी अफगानला फक्त एका विजयाची गरज आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यास तो जगातील सर्वात यशस्वी कर्णधार होईल. या क्रमवारीत भारताचा विद्ममान कर्णधार विराट कोहली ४४ पैकी २६ विजयासह सहाव्या क्रमांकावर आहे.