नाणार: शरद पवारांचं नाव घेऊन राज ठाकरे यांचा नवा गौप्यस्फोट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 9, 2021

नाणार: शरद पवारांचं नाव घेऊन राज ठाकरे यांचा नवा गौप्यस्फोट

https://ift.tt/3ccn4Xn
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई नाणार प्रकल्पाबाबत मांडलेल्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा आहे, असा दावा मनसे अध्यक्ष यांनी सोमवारी केला. शरद पवारांनी आपल्याला फोन करून भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. ( Supports My View on Nanar Project, Says ) राज ठाकरे यांची नाणारवासियांनी सोमवारी भेट घेतली. या भेटीत नाणारवासियांसमोर राज ठाकरे यांनी हा दावा केला. मुख्यमंत्र्यांशी लवकरच यासंदर्भात भेट घेणार आहेत, असेही राज ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला भेटीसाठी वेळ दिली नाही तरी शरद पवारांना नक्की वेळ देतील, असा टोला राज यांनी यावेळी लगावला. वाचा: दरम्यान, राज ठाकरेंच्या नाणारच्या भूमिकेचे देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्वागत केले आहे. राज ठाकरे यांनी योग्य भूमिका घेतली असल्याचे फडणवीस म्हणाले. नाणारमुळे कोकणचा विकास होणार आहे. हा राज्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी हा प्रकल्प व्हायलाच हवा, असा आग्रह फडणवीस यांनी धरला आहे.