मोदी, गडकरी, भागवतांच्या फोटोसहीत प्रियांकांची मुख्यमंत्री रावत यांना चपराक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 19, 2021

मोदी, गडकरी, भागवतांच्या फोटोसहीत प्रियांकांची मुख्यमंत्री रावत यांना चपराक

https://ift.tt/3eVpQDC
नवी दिल्ली : उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री यांनी महिलांबद्दल काढलेल्या अपमानकारक शब्दांमुळे त्यांच्यावर मोठी टीका होतेय. ' घालून महिला मुलांना काय संस्कार देणार?' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियातून जोरदार विरोध झालेला दिसून आला. मुख्यमंत्र्यांच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर काँग्रेस महासचिव यांनी काही जुने फोटो शेअर करत भाजपवर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधलाय. प्रियांका गांधी यांनी आरएसएसची खाक्या रंगाचा गणवेश केलेला पंतप्रधान , सरसंघचालक आणि केंद्रीय मंत्री यांचे काही जुने फोटो शेअर केलेले आहेत. हे त्यावेळचे फोटो आहेत जेव्हा आरएसएस स्वयंसेवक पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि खाक्या रंगाची अर्धी पॅन्ट असा पोशाख चढवत होते. 'अरे देवा, यांचे तर उघडे गुडघे दिसत आहेत' असं मजेशीर कॅप्शन देत प्रियांका गांधी यांनी आपल्या फोटोला दिलंय. सोबतच #RippedJeansTwitter असा हॅशटॅगही त्यांनी जोडलाय. आजकाल महिला फाटलेली जीन्स वापरतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार? महिलांच्या गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स पाहून वाटतं की यामुळं समाजात काय संदेश जाईल?' असं म्हणत मुख्यमंत्री रावत यांनी महिलांच्या कपड्यांवरून टीका केली होती. तीर्थ सिंह रावत यांनी आपल्या या वक्तव्यासाठी माफी मागावी अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेतृत्वानं त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलीय. 'भाजप, संघाचे कार्यकर्ते किंवा संवैधानिक पदांवर बसलेल्या नेत्यांकडून अशी वक्तव्य केली जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण अशी वक्तव्य त्यांची मानसिकता स्पष्ट करतात' अशी टीका काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी केलीय. यापूर्वी आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे देखील अशा पद्धतीच्या वक्तव्यांमुळे अडचणीत आले होते.