इंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 19, 2021

इंधन दर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव

https://ift.tt/3vG2A2g
मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलात मोठी घसरण झाली असली तर स्थानिक बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर तूर्त कोणताही परिणाम झालेला नाही. पाच राज्यांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते. आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही. पश्चिम बंगालसह केरळ, आसाम व इतर राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे कंपन्यांनी इंधन दरवाढ टाळली आहे. तसेच गेल्या महिन्यात झालेल्या भरमसाठ दरवाढीने पेट्रोल १०० रुपयांवर गेले आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडले होते. परिणामी कंपन्यांनी इंधन दरवाढीबाबत सावध भूमिका घेतली आहे. आज सलग २० व्या दिवशी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.आज मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपयांवर कायम आहे. एक लीटर ८८.६० रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९१.१७ रुपये आहे. डिझेलचा भाव ८१.४७ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९३.१७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.४५ रुपये भाव आहे. आज शुक्रवारी कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९१.३५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.३५ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९४.२२ रुपये असून डिझेल ८६.३७ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.७६ रुपयांचा विक्रमी दर आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचा दर ९९.२१ रुपयांवर स्थिर आहे. जागतिक बाजारात मागील दोन सत्रात तेलाच्या दरात मोठी नफावसुली दिसून आली आहे.आज शुक्रवारी सिंगापूरमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ४.९० डॉलरने घसरला आणि ५९.४९ डॉलर इतका खाली आला. ब्रेंट क्रूडचा भाव ५.०१ डॉलरने घसरून ६२.९७ डॉलर झाला आहे. तेलाच्या किमतीत घसरण होत असल्याने तेल आयात करणाऱ्या कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.