मोठ्या पडद्यावर रंगणार मराठी कलाकारांचा 'झिम्मा' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 7, 2021

मोठ्या पडद्यावर रंगणार मराठी कलाकारांचा 'झिम्मा'

https://ift.tt/3rq7mOX
मुंबई: मराठी सिनेसृष्टी देखील आता हळूहळू रुळावर येतेय. मराठी सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा देखील आता जाहीर होऊ लागल्या आहेत. त्यात आता लवकरच हेमंत ढोमे दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा '' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. एप्रिलच्या अखेरीस हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा लॉकडाउनपूर्वी लंडनमध्येच चित्रित करण्यात आला होता. सिनेमात बऱ्याच कलाकारांची मांदियाळी आहे. चित्रपटसृष्टी, रंगमंच, टेलिव्हिजन गाजवणारे कलाकार यात पाहायला मिळणार आहेत. क्षिती जोग, सुहास जोशी, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत या कसलेल्या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. तगड्या कलाकारांची फळी यात असल्यामुळे आता 'झिम्मा'मध्ये काय दडलंय हे लवकरच कळेल.