Video: गब्बरसोबतच्या अ‍ॅक्शन सीनमध्ये दिसले होते ठाकूरचे हात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 19, 2021

Video: गब्बरसोबतच्या अ‍ॅक्शन सीनमध्ये दिसले होते ठाकूरचे हात

https://ift.tt/3s35wUu
मुंबई: बॉलिवूडचा सुपरहिट शोले चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात आजही तेवढाच उत्साह पाहायला मिळतो. अभिनेता धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन हे या चित्रपटात जय-वीरू यांच्या प्रमुख भूमिकांमध्ये दिसले होते. तर अभिनेता यांनी ठाकूर यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तर सुपरहिट झाला पण काही तांत्रिक कमतरतेमुळे इतर निर्मात्यांप्रमाणे या चित्रपटाच्या निर्मात्यांकडूनही काही उणीवा राहिल्या. या चित्रपटात ठाकूरला हात नसलेले दाखवण्यात आलं आहे. पण ठाकूर आणि यांच्यातील एका अ‍ॅक्शन सीनमध्ये ठाकूरचे हात दिसत असल्याचं नुकतंच एका व्हिडीओमधून समोर आलं आहे. ठाकूर आणि गब्बर सिंह यांच्या दरम्यान झालेल्या फाइटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यावर युझर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत. गब्बर सिंह निवृत्त पोलिस अधिकारी ठाकूर बलदेव सिंह याचे हात तोडून टाकतो असं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. नंतर जय आणि वीरू यांच्या मदतीनं ठाकूर आपला बदला घेतो. यात एक सीन असा आहे जेव्हा हात नसतानाही ठाकूर गब्बर सिंहला मारताना दिसतो. या सीनमध्ये कुर्त्याच्या खालून त्याचे हात दिसतात. (व्हिडिओ सौजन्य- phholmes यूट्यूब चॅनल) शोले चित्रपटात गब्बर सिंह ही खलनायकी भूमिका अभिनेता अमजद खान यांनी साकारली होती. या चित्रपटाची कथा सलीम-जावेद यांनी लिहिली होती. तर गोपाल दास सिप्पी आणि त्यांचा मुलगा रमेश सिप्पी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात हेमा मालिनी, जया बच्चन अशरानी, जगदीप या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटाच्या डायलॉग्सप्रमाणे चित्रपटाची गाणी सुद्धा खूप हिट झाली होती.