बच्चन विरुद्ध बच्चन! बॉक्सऑफिसवर पहिल्यांदाच बाप-लेकाची टक्कर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 21, 2021

बच्चन विरुद्ध बच्चन! बॉक्सऑफिसवर पहिल्यांदाच बाप-लेकाची टक्कर

https://ift.tt/393SY7T
मुंबई- बॉलिवूडमध्ये अनेकदा दोन मोठ्या कलाकारांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होतात. त्याचा प्रभाव त्या चित्रपटांच्या कमाईवर होतो. अनेकदा तर एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचे चित्रपट आमने सामने आल्याने जोरदार संघर्ष पाहायला मिळाला आहे. अशा वेळेस नाती विसरून कलाकार त्यांच्या चित्रपटांच्या कमाईकडे जास्त लक्ष देताना दिसतात. बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा अशीच जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच आणि यांचे चित्रपट एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. त्या दोघांचेही चित्रपट एका दिवसाच्या फरकाने प्रदर्शित होणार आहेत. अमिताभ त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साहित आहेत. अमिताभ आणि इम्रान हाश्मी यांचा '' ८ एप्रिल रोजी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटात गुन्हा आणि न्याय यामधील रहस्यमयी खेळ दाखवण्यात आला असून खेळात कोण जिंकणार याचा निर्णय सर्वस्वी अमिताभ घेणार आहेत. तर दुसरीकडे अभिषेक याचा '' ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी तयार आहे. हा चित्रपट शेअर मार्केटमधील सगळ्यात मोठ्या घोटाळ्यावर आधारित असून तो ९ एप्रिल रोजी डिस्नी हॉटस्टारवर पारदर्शित होणार आहे. एका दिवसाच्या फरकाने हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हे पहिल्यांदाच आहे जेव्हा अमिताभ याना टक्कर देण्यासाठी त्यांच्यासमोर खुद्द त्यांचा मुलगा आहे. त्यांनी यापूर्वी अनेकदा एकत्र काम केलं आहे परंतु यावेळेस त्यांच्या चित्रपटांची स्पर्धा असल्याने कोण जिंकणार हे पाहणं औसुक्याचं ठरेल. दोन्हीही चित्रपट वेगळ्या धाटणीचे असल्याने चित्रपटाच्या स्पर्धेबाबत कोणतीही भीती नसल्याचं अभिषेकने सांगितलं.