'शॉर्ट्स घातल्यामुळे मला स्टेजवरून खाली उतरवलं', प्रसिद्ध गायिकेने सांगितला अनुभव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 21, 2021

'शॉर्ट्स घातल्यामुळे मला स्टेजवरून खाली उतरवलं', प्रसिद्ध गायिकेने सांगितला अनुभव

https://ift.tt/3eXhJGw
मुंबई- अभिनेता सलमान खानच्या 'सुलतान' चित्रपटातील 'जग घुमेया' या गाण्याने सगळ्यांना तिच्या आवाजाची भुरळ पाडणारी गायिका म्हणजे . नेहाने अनेक हिट गाण्यातून श्रोत्यांना वेड लावलं. तिने 'धुनकी लागे', 'कुछ खास है', 'स्वैग से स्वागत', 'हिरीये' यांसारख्या गाण्याने चाहत्यांना तिच्या आवाजाच्या प्रेमात पाडलं. परंतु, तिलाही इतर महिलांप्रमाणे कपड्यांवरून बोलणी ऐकावी लागली होती. इतकंच नाही तर छोटे कपडे घातले म्हणून तिला मंचावरून खाली उतरवण्यात आलं होतं. नेहाने एका कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान या गोष्टीचा खुलासा केला. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया म्हणून तिने 'इंडियन प्रो म्युजिक लीग' च्या चित्रीकरणादरम्यान तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला. तिने म्हटलं, 'समाजात अनेक व्यक्ती एकाच प्रकारचं जीवन जगतात. एक व्यक्ती जे हवं तेच करत असते. त्यामुळे त्यांना असं वाटतं की एखादी गोष्ट करायची तिचं पद्धत योग्य आहे. आणि जेव्हा दुसरं कुणीतरी वेगळ्या पद्धतीने ती गोष्ट करायला जातं तेव्हा त्यांना ते चुकीचं वाटतं. पण माझ्यासोबत घडलेल्या त्या घटनेमुळे माझी इच्छाशक्ती अजूनच वाढली. माझी ती गोष्ट करायची इच्छा आणखी कित्येक पटीने वाढली. मी शॉर्ट्स घातल्याने मला एका कार्यक्रमादरम्यान मंचावरून उतरायला सांगण्यात आलं आणि मला तेव्हा त्याचं ऐकून भाग होतं. पण ती गोष्ट माझ्या मनात कायम राहिली.' पुढे नेहा म्हणाली, 'आज मी तेच करते जे मला आवडतं. ते कपडे घालते जे मला घालावेसे वाटतात. मी आज यशस्वी आहे. लोक माझं गाणं मन लावून ऐकतात. कुणीही माझ्या कपड्यांकडे पाहत नाही की मी काय घातलंय. कोणत्याही स्त्रीची स्वप्न तिच्या कपड्यांची लांबी मोजून ठरवता येत नाहीत. आज मी जशी आहे तसं मला श्रोत्यांनी स्वीकारलं आहे.' नेहाला तिच्या गाण्यांसाठी दोन वेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. शिवाय स्टारडस्ट पुरस्कारानेही तिला सन्मानित करण्यात आलं आहे.