संजय राऊतांचं ट्वीट चर्चेत; रोख नेमका कोणाकडे? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 21, 2021

संजय राऊतांचं ट्वीट चर्चेत; रोख नेमका कोणाकडे?

https://ift.tt/3c7L7rT
मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनातील लेख, अग्रलेख, पत्रकार परिषदा आणि वृत्तवाहिन्यांवर मुलाखतीच्या माध्यमातून खासदार हे पक्षाची भूमिका मांडत असतात. त्याचबरोबर फेसबुक व ट्विटरवरही ते अनेकदा पोस्ट करत असतात. सोशल मीडियातून विरोधकांवर निशाणा साधताना व्यंगचित्रे व शेरोशायरीवर त्यांचा भर असतो. आजही त्यांनी असाच एक शेर ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावरुन आता चर्चा रंगली आहे. (sanjay raut new tweet) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले असल्याची चर्चा आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. मात्र, आता त्यांनी केलेलं एक ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे. वाचा: संजय राऊत यांनी रविवारी सकाळीच एक ट्वीट केलं आहे. त्यांनी नेहमीप्रमाणेच शायरीतून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळं त्यांच्या ट्वीटचा नेमका अर्थ काय याविषयी चर्चा रंगली आहे. वाचा: काय आहे ट्वीट हमको तो तलाश बस नये रास्तों की है हम है मुसाफिर ऐसे जो मंझिल से आए है