मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री वयाच्या ३४ व्या वर्षी आई होणार आहे. ती लवकरच तिच्या तिसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. बाळाच्या येण्याने आनंदी असणारी लिसा सध्या आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. तिने तिच्या नवीन बाळाचं स्वागत तिच्या नवीन घरात करायचं ठरवलं आहे. तिने नुकतंच एक घर विकत घेतलं असून ती सध्या तिच्या घराचं इंटेरिअर करण्यात गुंतली आहे. गरोदर असूनही ती घराची सजावट करण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहे. लिसाने तिच्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लिसाचं नवीन घर अत्यंत सुंदर असून तिने स्वतः या घराचं इंटेरिअर डिझाईन केलं आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर घराचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून घराचा लुक दिसत आहे. तिने घराच्या नऊ फोटोंचं कोलाज बनवून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तिने घरासाठी मुखत्वे पांढरा, करडा आणि चॉकलेटी रंगाचा वापर केला आहे. काळ्या- पांढऱ्या रंगाच्या मार्बलचा वापर करून बनवलेलं डेकोरेशन पीस सोबत पांढऱ्या फर्निचरचा वापर करून घराला निराळा लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय ठिकठिकाणी आरशांचा वापर करून घराला हटके बनविण्यात आलं आहे. बेडरूमला पूर्णपणे पांढरा रंग देण्यात आला असून हे सर्व लिसाने स्वतः सजवलं आहे. लिसाने हे घर सजवण्यासाठी स्वतःची स्टाईल वापरत मॅगझीन आणि सोशल मीडियावरील साईटची मदत घेतली आहे. लिसा तिच्या गरोदरपणातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. लिसाने 'आयशा', 'हाऊसफुल ३', 'क्वीन' सारख्या चित्रपटात काम केलं आहे. 'क्वीन' चित्रपटातील कंगनासोबत लिसाने केलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. लिसाने तिचा बॉयफ्रेण्ड डिनो ललवानीसोबत लग्नगाठ बांधली होती.