
रायपूर: छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे सुरू आहे. टी-२० प्रकारातील या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक माजी क्रिकेटपटू खेळत आहेत. भारताकडून या स्पर्धेत , विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आदी दिग्गज खेळाडू खेळत आहेत. वाचा- या स्पर्धेत भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि श्रीलंका या देशातील संघ आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय सट्टेबाज आणि बुकी यांनी संधी साधळी आहे. गेल्या वर्षी करोनामुळे काही सामने झाल्यानंतर ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता गेल्या आठवड्यापासून त्याला पुन्हा सुरुवात झाली. एका अंदाजानुसार या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यावर ३० कोटीपेक्षा अधिक लावला जात आहे. वाचा- ... सोमवारी तेलीबांधा येथील एका हॉटेलमधून श्रीलंका आणि दक्षिम आफ्रिका यांच्यातील सामन्यावर सट्टा लावणाऱ्या काहींना अटक करण्यात आले. अटक करण्यात आलेल्यामध्ये बुकी कंसारासह तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधील सहा बुकींचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशी देशातील अनेक मोठे बुकी रायपूर आणि आसपासच्या परिसरात सक्रीय असल्याचे समोर आले. वाचा- रायपूरमध्ये सुरू असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड क्रिकेट सिरीजच्या निमित्ताने स्थानिक आणि देशातील मोठे सट्टेबाज एकत्रपणे काम करत आहेत. देशातील काही मोठ्या सट्टेबाजांनी शहरात नेटवर्क उभे केल्याचे कळते. मुंबई, गोवा, नागपूर, गुजरात, आंध्र प्रदेश येथील सट्टेबाज रायपूरमध्ये आहेत आणि ते रोज ३० कोटी इतकी सट्टा लावतात.