मोलकरणीने चोरलेले दागिने बॉयफ्रेंडकडे दिले; दोघेही 'असे' अडकले सापळ्यात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 7, 2021

मोलकरणीने चोरलेले दागिने बॉयफ्रेंडकडे दिले; दोघेही 'असे' अडकले सापळ्यात

https://ift.tt/3ro8TVL
नोएडा: नोएडाच्या सेक्टर १०० मधील लोटस बुलेवर्ड सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये झालेल्या दागिने चोरीचा छडा लागला आहे. दागिने करणाऱ्या मोलकरणीला आणि तिच्या प्रियकराला सेक्टर-३९ पोलिसांनी सेक्टर ४४मधून अटक केली आहे. मोलकरणीने दागिने चोरी करून प्रियकराकडे दिले होते. त्याने एका फायनान्स कंपनीत सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, रिया असे मोलकरणीचे नाव आहे. ती सेक्टर १०० मधील लोटस बुलेवर्ड सोसायटीत राहणाऱ्या एका मॅनेरजच्या घरी काम करत होती. त्यांच्याच फ्लॅटमध्ये ती राहायची. रियाने मॅनेजरच्या खोलीतून सोन्याच्या बांगड्या, सोनसाखळी, हिऱ्याची अंगठी चोरली. या प्रकरणी संबंधित मॅनेजरने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू केला. मोलकरणीने चोरलेले दागिने सेक्टर ९३ मध्ये राहणारा तिचा प्रियकर अमर कुमार याच्याकडे दिले. त्याने दिल्लीतील अशोक विहार येथील एका फायनान्स कंपनीत ते तारण ठेवले आणि त्यावर कर्ज घेतले. त्या कर्ज घेताना मोलकरणीचे ओळखपत्र दिले होते. यामुळे त्यांच्या गुन्ह्याचा छडा लागला. पोलिसांनी रिया आणि अमर कुमार यांना अटक केली.