नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहने १५ मार्च रोजी क्रीडा अँकर सोबत विवाह केला. जवळचे नातेवाइ आणि मित्रांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा गोव्यात पार पडला. बुमराहने लग्नाची बातमी सोशल मीडियावर फोटो शेअर करून दिली होती. वाचा- लग्नानंतर काल (शुक्रवारी) बुमराहने गोव्यात झालेल्या गँड रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो शेअर करत असताना त्याने गेले काही दिवस माझ्यासाठी शानदार असे राहिले. तुम्ही सर्वांनी दिलेले प्रेम आणि शुभेच्छांसाठी आभार आणि धन्यवाद असे म्हटले. वाचा- बुमराहने शेअर केलेल्या फोटोत तो आणि पत्नी संजना चालत येत आहेत तर दोन्ही बाजुला त्यांचे स्वागत फुरफुरबाज्याने करताना दिसत आहेत. एवढच निमित्त ठरले ज्यामुळे काही युझर्सना त्याला ट्रोल करण्याची संधी मिळाली. सोशल मीडियावर रिसेप्शनचे फोटो शेअर केल्यामुळे ट्रोल होऊ असा विचार देखीर बुमराहने केला नसेल. ट्रोल करणाऱ्यांनी बुमराहला याआधी शेअर केलेले एक ट्विटची आठवण करून दिली. त्या ट्विटमध्ये बुमराहने दिवाळीच्या निमित्ताने फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. आणि आता तो स्वत: फटाक्याच्या मधून चालत जाताना दिसतोय. वाचा- दिवाळीत फटाके फोडू नका असे आवाहन करणारा तू स्वत:च्या रिसेप्शनमध्ये फटाके कसे काय फोडतोस असा सवाल युझर्सनी त्याला विचारला आहे. बुमराहने लग्नासाठी इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी, टी-२० मालिका आणि वनडे मालिकेतून माघार घेतली आहे.