गेल्या २४ तासांत यंदाच्या वर्षातल्या सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 20, 2021

गेल्या २४ तासांत यंदाच्या वर्षातल्या सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद

https://ift.tt/3lyN1oz
नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासांत करोनाबाधित ४० हजार ९५३ रुग्ण आढळले आहेत. यासोबतच देशात एकूण संक्रमितांची संख्या १ कोटी १५ लाख ५५ हजार २८४ वर पोहचलीय. उल्लेखनीय म्हणजे गेल्या २४ तासांत २०२१ या वर्षातील सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद करण्यात आलीय. तर गेल्या २४ तासांत करोना संक्रमणामुळे १८८ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशात आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या करोना संक्रमित रुग्णांची संख्या १ लोख ५९ हजार ५५८ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या २ लाख ८८ हजार ३९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर तब्बल १ कोटी ११ लाख ०७ हजार ३३२ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. देशात आत्तापर्यंत ४ कोटी २० लाख ६३ हजार ३९२ नागरिकांचं लसीकरण पार पडलंय. 'इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'नं (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२१ पर्यंत देशात २३ कोटी २४ लाख ३१ हजार ५१७ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील एकूण १० लाख ६० हजार ९७१ नमुन्यांची चाचणी केवळ १९ मार्च रोजी पार पडलीय.