क्वॉडच्या बैठकी आधीच चीनची चिंता वाढली; आळवला शांततेचा सूर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 11, 2021

क्वॉडच्या बैठकी आधीच चीनची चिंता वाढली; आळवला शांततेचा सूर

https://ift.tt/3rOIjFz
बीजिंग: क्वॉड देशांच्या प्रमुखांच्या बैठकी आधीच चीनची चिंता वाढली आहे.अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांच्या बैठकीत या भागातील शांतता आणि स्थिरतेसाठी चर्चा होईल असे म्हणत चीनने शांततेचा राग आळवला आहे. क्वॉडची स्थापना चीनला शह देण्यासाठी झाली असल्याची चर्चा आहे. क्वॉड देशांच्या बैठकीत पहिल्यांदाच क्वॉड देशांच्या बैठकीत पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे चीनसह अनेक देशांचे लक्ष लागले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांना क्वॉड देशांच्या बैठकीबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले की, कोणत्याही क्षेत्रातील देशांमधील सहकार्यात शांततेतून विकास आणि लाभदायी ठरणाऱ्या सहकार्याच्या सिद्धातांचे पालन झाले पाहिजे, अशी चीनची भूमिका आहे. क्वॉड समूहातील देशदेखील हीच भूमिका लक्षात घेतील अशी आम्हाला आशा आहे. क्षेत्रीय शांतता, स्थिरता आणि समृ्द्धीसाठी हितकारक निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा आहे. वाचा: वाचा: क्वॉड आहे तरी काय? 'दि क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग' (क्वॉड)ची सुरुवात वर्ष २००७ मध्ये करण्यात आली होती. त्याआधी भारताने २००४-०५ मध्ये भारताने दक्षिण-पूर्व आशियातील सुनामीग्रस्त देशांना मदत केली होती. क्वॉडमध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारताचा समावेश आहे. मागील वर्षी मार्च महिन्यातही करोना संसर्गाच्या मुद्यावर क्वॉड देशांची बैठक पार पडली होती. वाचा: आशिया खंडात चीनच्या वाढत्या आर्थिक आणि लष्करी दादागिरीला उत्तर देण्यासाठी या क्वॉडची स्थापना झाली असल्याचे विश्लेषक सांगतात. हा गट स्थापन झाल्यानंतर चीनची चरफड सुरू झाली आहे.