गुजरात स्थानिक निवडणूक LIVE : भाजपचा दरारा कायम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 2, 2021

गुजरात स्थानिक निवडणूक LIVE : भाजपचा दरारा कायम

https://ift.tt/3uEeJnM
अहमदाबाद : गुजरातमध्ये ८१ नगरपालिका, ३१ जिल्हा पंचायत आणि २३१ तालुका पंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलानुसार भारतीय जनता पक्षानं आघाडी घेतल्याचं दिसून येतंय. गुजरातमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची रंगीत तालिम म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. LIVE अपडेट - ३१ जिल्हा पंचायतीच्या मतमोजणीत सध्या २० जागांवर आघाडीवर आहे. - महानगरपालिका निवडणुकीत भाजप ५४ जागांवर आघाडीवर आहे तर २ जागांवर आघाडीवर आहे. गेल्या रविवारी या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं होतं. राज्य निवडणूक आयोगानं जारी केलेल्या आकड्यानुसार, महानगरपालिकांसाठी ५८.८२ टक्के मतदान झालं होतं. तर जिल्हा पंचायतीसाठी ६५.८० टक्के मतदान झालं होतं तर तालुका पंचायतीत ६६.६० टक्के मतदान झालं होतं. नुकत्याच झालेल्या सहा पालिका निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला होता. या निवडणुकीत भाजपनं ५७६ जागांपैकी ४८३ जागांवर विजय मिळवला होता.