
नवी दिल्लीः देशात करोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत अचानक मोठी वाढ दिसून येत आहे. ही बाब प्रशासन आणि सरकारसाठी चिंतेची बनली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचे घेण्यात येत आहे. आता दिल्लीतील एम्सचे संचालक ( ) यांनी देशातील करोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत अचानक झालेली वाढ आणि नवीन स्ट्रेनबाबत मोठं भाष्य केलं आहे. भारतात आता ब्रिटनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या काळात ब्रिटनमध्ये अशी स्थिती होती, असं गुलेरिया म्हणाले. होळीच्या काळात देशात करोनाच्या नवीन रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ झाली आहे. देशात करोनाचा एखादा नवीन व्हेरियंट असावा जो व्हायरसला अधिक संसर्गजन्य बनवत आहे. आपल्याकडे यासंदर्भात कुठलाही डेटा नाहीए. पण याचा अर्थ असं काही घडत नाहीए असं नाही. करोना व्हायरसमधील म्युटेशनमुळे रुग्णांमध्ये अचानक वाढत झाल्याचं सरकारला वाटतंय, असं गुलेरिया यांनी सांगितलं. करोनाच्या नवीन रुग्णांमध्ये अचानक वाढ होणं म्हणजे नक्कीच काही तरही घडतंय जे करोना व्हायरसला अधिक संसर्गजन्य बनवत आहे, अशी दाट शक्यता आहे. यामुळे करोनावरी लसीकरणासोबतच नागरिकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपण नागरिकांपर्यंत पोहोचू आणि लस देता येईल, अशी रणनिती आपल्याला तयार करावी लागेल. पण कुठलाही संसर्ग होणार नाही, अशा प्रकारे ही रणनिती तयार केली पाहिजे, असं ते म्हणाले. एनडीटीव्ही वाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. कोविशिल्ड लसीचे निर्माते एस्ट्रझेनेका आणि कोवॅक्सिनचे निर्माते भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना मुलांसाठी उपयोगी लसीची निर्मितीवर विचार करत आहेत. मुलांना पुन्हा शाळेत पाठवायचं असेलत तर आपल्याला त्यांच्यासाठी लस तयार करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे वाढता संसर्ग पाहता जिल्हा केंद्रीत पावलं तातडीने उचलण्याची गरज आहे, असं आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी केलं होतं.